ETV Bharat / state

Sword attack after shooting : नांदेडमध्ये गोळी झाडून केला तलवारीने हल्ला; एक जण जखमी - Arrest of criminals

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या (Nanded Rural Police) हद्दीत असलेल्या तुप्पा येथे पिस्तुलातून गोळी झाडून युवकाचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने हा प्रयत्न अयशस्वी ठरला त्यानंतर तलवारीने (Sword attack after shooting) संबंधित युवकाला जखमी (One person was injured) करुन हल्लेखोराने पळ काढला.

shooting
गोळीबार
author img

By

Published : May 1, 2022, 2:06 PM IST

नांदेड: बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर (Professional Sanjay Biyani murder) नांदेड शहरात पोलीस दल गुन्हेगारांची धरपकड (Arrest of criminals) करुन त्यांच्याकडून अवैध शस्त्र जप्त करत असताना शनिवारी दुपारी जवाहरनगर तुप्पा येथे गोळीबारीची घटना उघडकीस आली. हल्लेखोराकडून गोळीचा नेम चुकल्याने तलवारीच्या साहाय्याने युवकाला जखमी करून हल्लेखोर पसार झाला. नांदेड शहरात व जिल्ह्यात अवैध बंदुका, तलवारी, खंजीर जप्त करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस परिश्रम घेत असताना आज शनिवारी पुन्हा एकदा शहरात गोळीबाराची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी जवाहरनगर तुप्पा भागात दिलीप पुंडलिकराव डाखोरे रा. शंभरगाव ता.लोहा याने पिंटु कसबे या युवकावर क्षुल्लक कारणावरुन गावठी पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र या हल्ल्यात डाखोरेचा नेम चुकला तेंव्हा डाखोरेने पुन्हा जवळच्या तलवारीच्या साहाय्याने पिंटु कसबेच्या पायावर वार करून त्याला जखमी केले आणि तो पसार झाला.

दिलीप डाखोरे हा एका प्रमुख गँगचा एक सदस्य आहे.गोळीचा नेम चुकला तरी त्याने तलवारीच्या साहाय्याने युवकावर हल्ला करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर भोरे, पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड घटनास्थळी पोहचले. या प्रकरणाचा तपास सुरु असून जखमी पिंटू कसबेवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेहीवाचा : Nanded Police Seized Swords : धुळ्यानंतर नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 25 तलवारी जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.