नांदेड - सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बाप-लेकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. केरबा केंद्रे आणि शंकर केरबा केंद्र (रा. वागदरवाडी, लोहा) असे मृत बाप लेकाचे नाव आहे.
मृत केरबा पांडु केंद्रे (वय ४५) आणि मुलगा शंकर केरबा केंद्रें (वय १७) यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांच्या नंतर कुटूंबात पत्नी प्रयागबाई केंद्रे आणि आई राजाबाई केंद्रे (वय १०० वर्ष) तसेच मुलगी संजीवनी असा परिवार असून संजीवनीचे लग्न झालेले आहे.
दरम्यान, या कुटूंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली गावकरी करित आहेत. प्रकरणी माळाकोळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक एस.एस.कराड पुढील तपास करीत आहेत.