ETV Bharat / state

नांदेडात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी - nanded farming news

नांदेड जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने चक्क स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. यामुळे स्ट्रॉबेरी पिकाला मराठवाड्यातील हवामान पोषक नाही, असा शेतकऱ्यांचा समज दूर झाला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 20, 2020, 8:39 PM IST

Updated : Dec 20, 2020, 9:48 PM IST

नांदेड - स्ट्रॉबेरीची शेती म्हटले महाबळेश्वर जिल्ह्याची आठवण येते. मात्र नांदेडातील एका तरुणाने चक्क आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. अर्जुन जाधव, असे त्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. लोहा तालुक्यातील डेरला येथे हा यशस्वी प्रयोग केला आहे.

बोलताना शेतकरी

अर्जुन जाधवने विंटर डाऊन जातीच्या स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे. ही रोप सातारा येथील रोपवाटिकेतून मागवण्यात आली आहेत. यासाठी जाधव यांना प्रति रोप 12 रुपये खर्च आला आहे. एकूण दहा गुंठे जमिनीवर स्ट्रोबवरीची लागवड करण्यात आली आहे. यासाठी एकूण खर्च 80 हजार रुपये इतका आला आहे. तर अर्जुन जाधव यांना स्ट्रॉबेरीच्या शेतीतून 80 क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा आहे.

अशी केली लागवड

स्ट्रॉबेरी लागवडीपूर्वी शेतीची मशागत करण्यात आली. शेणखत, गांडूळ खत आणि बुरशी नाशकाचा वापर करण्यात आला. स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी चार फूट अंतरावर गादी वाफे तयार केली आहेत. त्यावर ठिंबक सिंचन आणि मल्चिंग (पलवार) करण्यात आली आहे. एक फूट अंतरावर एकूण सहा हजार रोपे लावण्यात आली आहेत. अर्जुन जाधवने यासाठी कसलाही रासायनिक औषधांचा वापर केला नाही. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.

विठोबा नैसर्गिक भाजीपाला आणि शेतमाल विक्री केंद्राच्या माध्यमातून विक्री

स्ट्रॉबेरी पिकाला मराठवाड्यातील हवामान पोषक नाही, असा समज शेतकरी वर्गात होता. मात्र, योग्य नियोजन केले तर स्ट्रॉबेरीचे चांगले उत्पन्न घेऊ शकतो हे अर्जुन जाधव या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. आता स्ट्रॉबेरीची विक्री विठोबा नैसर्गिक भाजीपाला आणि शेतमाल विक्री केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

हेही वाचा - अर्धापूर-वसमत रस्त्यावर कामठा पाटीजवळ ट्रक-जीपचा अपघात; पाच जखमी

हेही वाचा - नांदेड : शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जण जखमी

Last Updated : Dec 20, 2020, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.