नांदेड - विद्यापीठात तरुणीच्या विनयभंगाच्या घटनेचा आज विद्यार्थ्यांनी निषेध केला. शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटवर एकत्र येत निदर्शने केली. विद्यापीठाच्या परिसरात येऊन विद्यार्थीनींचा विनयभंग झाल्याच्या घटनेने सारेच विद्यार्थी संतप्त झाले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जवाबदारी असणाऱ्या कुलसचिवांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे विद्यापठाच्या कुलसचिवांना निलंबित करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरु यांच्याकडे केली.