ETV Bharat / state

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टीच्या दारू अड्यांवर छापा

Intro:नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी हातभट्टी दारूवर छापा.- सात आरोपींना अटक, सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाराज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी विविध ठिकाणी छापे मारून गावठी दारू प्रकरणी 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सात आरोपींना अटक केली असून उर्वरित 10 गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झालेले नाहीत.ल जप्त.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 8, 2020, 4:23 PM IST

नांदेड - कोरोना उपाययोजनेसाठी केलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी विविध ठिकाणी छापे मारून गावठी दारू प्रकरणी 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सात आरोपींना अटक केली असून उर्वरित 10 गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. पथकाने गावठी दारू व साहित्यासह 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी अत्यावश्यक वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने मद्य शौकिनांची चांगलीच गोची झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री होत असल्याने काळा बाजार करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. नेहमीची सवय असलेल्या अनेकांना हे चढे दर परवडत नसल्याने सहज उपलब्ध होणाऱ्या हातभट्टीच्या अवैध दारुकडे ते वळले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने राबवलेल्या पथकामार्फत विशेष मोहीम राबवून अवैध दारुविरोधात कारवाई करण्यात आली. पथकाने लोणी तांडा, कोटग्याळ तांडा, उदरी तांडा, जाहूर तांडा, राजूर तांडा, होनवडज तांडा, नांदेड शहर व परिसरात उघडकीस आणलेले गुन्हे पुढीलप्रमाणे

एकूण गुन्हे : 17, आरोपी निष्पन्न व अटक:7, अज्ञात आरोपी व बेवारस गुन्हे: 10, दुचाकी वाहन:1, हातभट्टी दारू: 60 लीटर, अवैध ताडी: 350 ली रसायन 4150 लीटर. एकूण मुद्देमाल 1 लाख 30 हजार 120 रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.