ETV Bharat / state

...म्हणूनच सांगतोय हवा बदलतेय - शरद पवार - nanded

नांदेड येथे पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय दिग्गज एका मंचावर आल्याने चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली.

नांदेड येथे पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
author img

By

Published : Feb 22, 2019, 12:09 AM IST

नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे बोट धरून राजकारणात आले, असे म्हणतात. तसेच, मला राजकारणाची हवा कळते असे ते म्हणाले होते. म्हणूनच सांगतोय हवा बदलत आहे. लोकांच्या भावना बदलत आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश हे बदलत्या हवेचे द्योतक आहे, अशी मिश्किल टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. बुधवारी नांदेडमधील एका कार्यक्रमात पवार यांनी सत्ताधाऱयांवर टिप्पणी केली.

नांदेड येथे पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नांदेड येथे पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय दिग्गज एका मंचावर आल्याने चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. पुतळा समितीचे अध्यक्ष शिवसेना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याची सुरुवात करून वाट मोकळी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत कुणी गुरू... कुणी चेला नाही. इथे सगळेच एकाच वर्गातले विद्यार्थी आहेत, असे ते म्हणाले. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या परिसरात श्यामराव कदम यांचा पुतळा व्हावा, अशी भावनाही अशोक चव्हाणांकडे बोट करत व्यक्त केली.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी शरद पवार यांच्याभोवतीच भाषण फिरवले. पवार यांचा 'जाणता राजा' असा उल्लेख करत मोदींनी केलेल्या स्तुतीची आठवण करून दिली. मला पवार यांनीच मंत्रिमंडळात घेतले. तर काहींनी पदावरून काढले, अशी चव्हाणांवर अप्रत्यक्षपणे टीका करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

अशोक चव्हाण यांनीही त्यांच्यावरील टीकेचा मिश्किलपणे समाचार घेतला. अशोक चव्हाण बोलताना म्हणाले, की शंकरराव चव्हाण यांना श्यामराव कदम यांनी इमानदारीने साथ दिली. सख्ख्या भावाप्रमाणे साथ दिली. शंकरराव चव्हाण यांनी राज्य सांभाळत नांदेड सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शेवटी कोण कुठे राहायचे, हे जनता ठरवते. जनताच खरी मालक आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
भास्करराव शरद पवार यांच्यामुळे मंत्रीमंडळात आलो असे म्हणतात तर मोदीही पवार साहेबांची स्तुती करतात. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला यश मिळणार यात शंकाच नाही. अतीत के उपर भविष्य का निर्माण होता है.. असे म्हणत विकासात जिल्हा मागे पडता कामा नये, असेही ते म्हणाले.

undefined

Intro:मला हवामानाचे अंदाज कळतात म्हणूनच तर...
शरद पवार यांची नांदेड मध्ये मिश्किल टोलेबाजी..Body:मला हवामानाचे अंदाज कळतात म्हणूनच तर...
शरद पवार यांची नांदेड मध्ये मिश्किल टोलेबाजी..

नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, माझं बोट धरून राजकारणात आले पण त्यांचे अनेक काही चुकीचे निर्णय आहेत. त्यास मी संसदेत विरोध केला तर सहकारी म्हणतात तुमचेच बोट धरून ते राजकारणात आले म्हणत माझ्याकडेच बोट दाखवतात. अशा शब्दात मोदींच्या या वाक्यावर टिप्पणी केली. त्यात दुसरे एक म्हणजे शरद पवारांना राजकारणाची हवा कळते असे मोदी म्हणाले होते. हवा बदलत आहे. यात शंका नाही. लोकांच्या भावना बदलत आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश हे बदलत्या हवेचे द्योतक आहे. नांदेड मधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मिश्कील टोलेबाजी करत राजकीय जुगलबंदीत सहभाग घेतला.
नांदेड येथे पदमश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकीय दिग्गज या निमित्ताने एका मंचावर आल्यानंतर चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली.
पुतळा समितीचे अध्यक्ष आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याची सुरुवात करून वाट मोकळी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत कुणी गुरू...कुणी चेला नाही इथे सगळेच एकाच वर्गातले विद्यार्थी आहेत असे म्हणाले. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या परिसरात श्यामराव कदम यांचा पुतळा व्हावा. अशी भावनाही व्यक्त करून खा.चव्हाण यांच्याकडे अपेक्षा करून बोटे केली.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. शरद पवार यांच्याभोवतीच त्यांचे भाषण फिरले. शरद पवार यांचा 'जाणता राजा' असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्तूतीची आठवण सांगितली. नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात, मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो. त्यासोबतच पवार राजकीय हवामान लक्ष्यात येते असे म्हणाले. त्यासोबतच मला पवार यांनीच मंत्रिमंडळात घेतले. तर काहींनी काढले अशा खा.अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका करत आपल्या मनातील खदखद व्यक्त करून आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली.
खा.अशोकराव चव्हाण यांनीही त्यांच्यावरील टीकेचा मिश्किलपणे समाचार घेतला. अशोक चव्हाण बोलताना म्हणाले की, शंकरराव चव्हाण यांना श्यामराव कदम यांनी इमानदारीने साथ दिली. सख्या भावाप्रमाणे साथ दिली. नांदेड सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. तर शंकरराव चव्हाण यांनी राज्य सांभाळत विविध योजना जिल्ह्याला आणून देऊन विकास केला. शेवटी कोण कुठे राहायचे हे जनता ठरवते. जनताच खरी मालक आहे. त्यात थोडे नशीबही असावी लागते म्हणून विरोधकांना टोला लगावला. शरद पवार यांच्यामुळे मंत्रीमंडळात आलो. भास्करराव म्हणतात की, पवार साहेबांची स्तूती मोदी करतात. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला यश मिळणार यात शंका नाही. अतिथ के उपर भविष्य का निर्माण होता है..असे म्हणत विकासात जिल्हा मागे पडता कामा नये. बऱ्याच लोकांना मनमोकळे करण्याची संधी मिळाली. बरेच जण वेगवेगळ्या सभागृहात आहेत तर काही सभागृहाच्या बाहेर आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम झाले तर मनमोकळे करण्याची संधी मिळते. अशा शब्दात संवादाचे समर्थन करत यातून मार्ग निघावा. अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या सर्व राजकीय जुगलबंदीचा शेवट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी करत भास्करराव खतगावकर यांच्या स्तूतीसुमनाना उत्तर देत म्हणाले की, मला वाटले भास्करराव माझ्याच पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत आहेत की काय? असे वाटत होते. असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पण माझी प्रकृती ठणठणीत आहे. तसेच मोदी सरकार वरही टीकेची संधी सोडली नाही. शेती आणि बेरोजगारी यांचा मोठा प्रश्न आहे अशी टीका केली. सत्ता असो अथवा नसो लोकांसाठी काम करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहीजे. मोदी म्हणतात माझं बोट धरून राजकारणात आले. या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांना राजकारणाची हवा मला कळते असे म्हणाले होते. होय मला ते आता कळत आहे. हवा बदलत आहे. यात शंका नाही. लोकांच्या भावना बदलत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश हे बदलत्या हवेचे द्योतक आहे. अशा शब्दांत टोलेबाजी करत या राजकीय जुगलबंदीचा शेवट केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.