ETV Bharat / state

Valentines Day Crime In Nanded: 'व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो'; महाविद्यालयीन तरुणावर पॉस्कोचा गुन्हा - Valentines Day Crime In Nanded

नांदेडमध्ये महाविद्यालयात सोबत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीची 'व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो' असे म्हणून पाठलाग केला. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरुन या तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Valentines Day Crime In Nanded
क्राईम
author img

By

Published : Feb 14, 2023, 5:32 PM IST

Updated : Feb 14, 2023, 6:01 PM IST

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडलेल्या गुन्ह्याविषयी सांगताना

नांदेड: एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणाई व्हॅलेंटाईन डेच्या प्रतीक्षेत असतात. परंतु एकतर्फी प्रेमातून अनेक वाईट घटनाही या दिवशी घडतात. शहरातील वजिराबाद भागात अशीच एक घटना घडली. मंगळवारी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येत आहे. परंतु नांदेड शहरात या दिवसाच्या पूर्वसंध्येला वजिराबाद पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.

तरुणावर पॉस्कोचा गुन्हा नोंद: वजिराबाद भागात असलेल्या एका महाविद्यालयात अल्पवयीन तरुणी शिक्षण घेत होती. काल 13 तारखेला ही मुलगी सकाळी साडेआठ वाजता महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता महाविद्यालयाच्या पायऱ्या उतरत असताना त्याच महाविद्यालयातील आदी आझाद बागडीया (१८) हा तरुण तिच्याजवळ आला. 'व्हॅलेंटाईन डे आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो. तुम मुझे बहोत पसंद हो' असे म्हणत या विद्यार्थिनीचा पाठलाग त्याने केला. त्यानंतर पीडितेने घरी आल्यानंतर ही बाब आईला सांगितली. आईने थेट वजिराबाद पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात तक्रार दिली. त्यावरुन आदी बागडीया या तरुणावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास पोउपनिरीक्षक गिरे करीत असल्याची माहिती नि.जगदिश भंडरवार यांनी दिली.

व्हॅलेंटाईन गिफ्टसाठी बकरीची चोरी: दुसऱ्या एका घटनेत प्रेयसीला भेट देण्यासाठी म्हणून बकरी चोरणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेयसीला भेटवस्तू घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्याने बकरी चोरून ती विकून भेटवस्तू खरेदी करण्याचा बेत आखला होता. ही घटना तामिळनाडू राज्यातील विल्लुपुरम येथे घडली. त्यामुळे तरुणांच्यात व्हॅलेंटाईनची क्रेझ किती आहे, ते दिसून येत आहे.

पोलीससुद्धा थक्क: महागडे व्हॅलेंटाइन गिफ्ट देण्यासाठी बकरी चोरी करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली आहे. हा तरुण ती चोरलेली बकरी विकून त्या पैशातून आपल्या मैत्रीणीला व्हॅलेंटाईन गिफ्ट देणार होता. या चोरीत त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली आहे. जगभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडप्यांनी भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्या मैत्रिणीला खूश करण्याच्या प्रयत्नात त्याने हे कृत्य केले. या चोरीच्या घटनेने पोलीससुद्धा थक्क झाले आहेत.

हेही वाचा : Ram Kadam Criticized Supriya Sule: लव जिहाद बाबत केंद्राच्या निर्णयाला सुप्रिया सुळेंना विरोध करता येणार नाही - राम कदम

Last Updated : Feb 14, 2023, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.