ETV Bharat / state

ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी - नांदेड ग्रामपंचायती मतमोजणी

मतमोजणी केंद्र परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी त्याच दिवशी आठवडी बाजार असतील तर ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

नांदेड
नांदेड
author img

By

Published : Jan 17, 2021, 7:45 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

इतर व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित...!

मतमोजणी केंद्र परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी त्याच दिवशी आठवडी बाजार असतील तर ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

तालुकानिहाय मतमोजणी

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी ही माहिती व तंत्रज्ञान इमारत स्थापत्य अभियंत्रिकी विभाग शासकिय तंत्रनिकेतन कॉलेज नांदेड येथे होणार आहे. तर अर्धापूर तालुक्यासाठी तहसील कार्यालय अर्धापूर. भोकर - तळमजला तहसील कार्यालय भोकर. मुदखेड - तहसील कार्यालय मुदखेड. हदगाव- मागासवर्गीय शासकीय मुलींचे वसतिगृह तामसा रस्ता हदगाव. हिमायतनगर- तहसील कार्यालय हिमायतनगर. किनवट- औद्योगिक प्रशिक्षण संस्था तळमजला किनवट. माहूर- तहसील कार्यालय माहूर येथील सभागृह. धर्माबाद- शासकीय तंत्रप्रशाला आयटीआय बासर रस्ता धर्माबाद. उमरी- तहसील कार्यालय उमरी. बिलोली - तहसील कार्यालय बिलोली. नायगाव - तहसील कार्यालय नायगाव. देगलूर - प्रशासकीय इमारत पंचायत समिती सभागृह देगलूर. मुखेड - तहसील कार्यालय मुखेड. कंधार- श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रस्ता कंधार तर लोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर रस्ता लोहा येथे मतमोजणी होईल. ही मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होऊन मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सुरू राहील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.