नांदेड - अशोक चव्हाण यांची अवस्था बिकट झाली आहे. प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांना गल्लीबोळात फिरावे लागत आहे. त्यांना आता तालुकाध्यक्ष केले पाहिजे, असा टोला महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लगावला. ते मालेगाव येथील प्रचारसभेत बोलत होते.
प्रताप पाटील चिखलीकर यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव, देगाव (बु.), येळेगाव, बारसगाव, लहान, लोणी बु. लोणी खु., आंबेगाव, पाटनूर, लहान, कोंढा व बारड ता.मुदखेड या गावांतून प्रचार केला. यावेळी प्रचारासाठी मालेगाव येथे त्यांची जाहीर सभा झाली. इसापूर धरणाच्या पाण्यावरून चुकीचे राजकारण केले जात असल्याची टीका चिखलीकर यांनी केली. ते म्हणाले, की लोकांना पाणी बंद करण्याची धमकी दिली जात आहे. मात्र, थेंबभरही पाणी कमी होऊ देणार नाही, अशी त्यांनी दिली. जिल्ह्यात राजकारण करत असताना अनेक नेते संपवविण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केल्याचा त्यांनी आरोप केला.
गोरठा येथील सभेत बापुसाहेब गोरठे म्हणाले होते की, गोरठेकर-चिखलीकर यांची मैत्री ही जिल्ह्यालाच नाही तर राज्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ओळखून घ्या, बापुसाहेबांना नेमके काय म्हणायचे आहे. यावेळेची लढत बरोबरीच्या पैलवानांबरोबर आहे. अशोक चव्हाणांपेक्षा जास्त पेच मला जास्त माहिती आहे. त्यामुळे यावेळी भाजपचा खासदार होणार यात शंका नसल्याचे चिखलीकर यावेळी म्हणाले. ज्यांचे त्यांच्या पक्षात कोणी जर ऐकत नसेल मतदारांनीही त्यांचे का ऐकावे हा प्रश्न आहे. माझे माझ्या पक्षात सर्वच ऐकतात. भाजपचा खासदार झाल्यास पुन्हा ते उद्योग सुरू करणे व नवीन उद्योग आणले जातील. जिल्ह्यात केंद्र व राज्यशासनाचा हजारो कोटी रुपयांचा निधी आल्याचा त्यांनी गोरठेकर यांनी केला.
यावेळी विविध मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. सभेला भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख, भुजंग पाटील, बबनराव बारसे, उपसभापती डॉ.लक्ष्मणराव इंगोले, नागोराव इंगोले, बालाजी मरकुंदे आदी उपस्थित होते.