नांदेड - माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने सर्व पक्षातील माझ्या मित्रांना अशोक चव्हाण यांचा बदला घेण्याची एक नामी संधी चालून आली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार प्रताप पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
ते म्हणाले, जिल्ह्यात विविध पक्षात माझे मित्र आहेत. हे खरे असले तरी त्यांनाही पक्षनिष्ठा असतेच. त्यांच्यावर अशोक चव्हाण यांचा प्रचंड दबाव असतो. मी त्यांच्यावर कुठलाही दबाव आणला नाही, असे राजकारण करायला मी काही अशोक चव्हाण नाही. जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाने सर्वांना संपविण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले. त्यांना माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने एक नामी संधी चालून आली असल्याचे ते म्हणाले.