ETV Bharat / state

दीड हजाराची लाच घेताना बीट जमादार एसीबीच्या जाळ्यात - umari crime news

सोमठाणा येथील २५ वर्षीय महिलेने पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रार केली होती. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी बीट जमादार संभा कदम यांनी तिला लाच मागितली होती. उमरी येथील एका हॉटेलमध्ये १५०० रुपयाची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली.

nanded acb
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
author img

By

Published : May 19, 2021, 5:17 PM IST

नांदेड - पतीकडून त्रास होत असल्याने विवाहितेला गुन्हा दाखल करण्यासाठी बीट जमादाराने तीन हजार रुपयाच्या लाच मागितल्याची घटना उमरी तालुक्यातील सोमठाणा येथे उघडकीस आली आहे. उमरी येथील एका हॉटेलमध्ये १५०० रुपयाची लाच घेताना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने बीट जमादार संभा कदम यांना रंगेहात पकडले.

गुन्हा दाखल करण्यासाठी मागितली लाच...

सोमठाणा येथील २५ वर्षीय महिलेचा विवाह बिलोली तालुक्यातील कोळगाव येथे एका व्यक्तीसोबत झाला होता. लग्नानंतर पती-पत्नीत कुरबुरी होऊ लागल्या. त्यामुळे या दोघांना सोमठाणा येथे सालगडी म्हणून ठेवण्यात आले होते. मात्र तो पत्नीस सतत मारहाण करत होता. अशाप्रकारे एक दिवस दोघांमध्ये भांडण झाले आणि पतीने पत्नीला मारहाण केली व तो गावाला निघून गेला. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उमरी पोलीस ठाण्यात कलम ४९८नुसार फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी या भागाच्या बीड जमादार संभा कदम यांनी तिला पैशाची मागणी करुन दमदाटी केली.

दीड हजाराची लाच घेताना रंगेहात पडकले....!
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. प्रकरणाचा तपास सुरू असताना जमादार संभा कदम यांना येथील बस स्थानकाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये १५०० रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.