नांदेड - दुचाकीला फॅन्सी नंबर प्लेट लावण्याची सध्या तरुणांमध्ये क्रेझ आहे. अशाच एका नंबर प्लेटमुळे एका तरुणाला ३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. शहरातील आयटीआय चौकात येवले चहा येथे एक दुचाकीस्वार चहा पिण्यासाठी आला होता. या दरम्यान शहरातील वाहतूक शाखेकडून वाहन तपासणीची मोहीम सुरु होती. दुचाकीस्वाराच्या नंबर प्लेटवर 'ओम साई' असे लिहिलेले होते. यामुळे वाहतूक शाखेने संबंधित दुचाकीस्वाराला तीन हजाराचा दंड लावला.
यामुळे या दुचाकीस्वाराला चहा पिणे महागात पडल्याची चर्चा सुरू होती. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम व त्यांचे सहकारी शहरातील आयटीआय चौकात वाहन तपासणीच्या मोहिमेवर होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार आयटीआय चौकात येवले चहा घेण्यासाठी आला होता. या दरम्यान पोलिसांच्या पथकाने त्याच्या वाहनावर असलेल्या ओम साईची नंबर प्लेट पाहून कारवाई करत तीन हजाराचा दंड ठोठावला. या पथकात पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम,गजानन ढवळे, विनोद पवार, कीर्तीकुमार कौठेकर, मारकवाड, बोईनवाड, पंकज इंगळे, कुरमाते, विष्णू पानोटे, संदीप वाघाडे यांचा समावेश होता.