ETV Bharat / state

मारहाण प्रकरणात दोन महिन्यापासून फरार माजी नगराध्यक्ष दोसानींना अटक - आरोपी

लोकसभा निवडणूक प्रचारात झालेल्या वादातून मारहाण झाली होती. याप्रकरणी माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी हे फरार होते. त्यांना यवतमाळ पोलिसांनी अटक करत माहूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी
author img

By

Published : Jul 1, 2019, 8:44 PM IST

नांदेड - राजकीय वादातून झालेल्या मारहाणीनंतर माहूरचे माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे ७१ दिवसापासून फरार होते. त्यांना यवतमाळ पोलिसांनी अटक करुन माहूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई यवतमाळ पोलिसांनी रविवारी केली. त्यांच्यासह आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून दोसानी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, त्यांना न्यायालयात दिलासा मिळाला नाही.

दोसानी यांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ शनिवारी संपला आणि रविवारी त्यांना पोलिसांनी पकडले. दरम्यान अटक केल्यानंतर दोसानीला माहूर येथे आणले असता, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नांदेडहून खास दंगल नियंत्रण पथक बोलावण्यात आले होते. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या व्यक्तिगत टिप्पणीनंतर माहूर येथे १९ एप्रिलला जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव व भाजपचे युवानेते सुमित राठोड यांच्यात वाद झाला होता.

याप्रकरणी सुमित राठोड यांच्या तक्रारीवरून जबर मारहाण व मौल्यवान ऐवज लंपास केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपपैकी माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी ( वय ३७ वर्षे, रा. माहूर ) व उकंडराव मोहन जाधव ( वय ४० वर्षे, रा. लोकरवाडी ता. माहूर ) यांना दुपारी दोन वाजता यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने दाते चौक यवतमाळ येथे अटक करून माहर पोलिसांच्या स्वाधीन केले.

यवतमाळ येथील दाते चौकात हे दोघे एका हेअर सलूनमध्ये दाढी करत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून त्यांना अटक केली. याबाबत यवतमाळ पोलिसांनी माहूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर माहूर येथून पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके, शिपाई लिंगायत यांनी आरोपींना यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ताब्यात घेऊन सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान माहूर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान शहरात शांततापूर्ण वातावरण राहण्यासाठी नांदेड येथून दंगल नियंत्रण पथक बोलावण्यात आले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणातील एकूण २१ आरोपींपैकी ६ आरोपी यापूर्वीच माहूर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. अटक केलेल्या २ आरोपीनंतर रितेश चरण राठोड ( वय २० वर्षे, रा. आसोली ) हा माहूर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधवसह एकूण १२ आरोपी अद्याप फरार आहेत.

Intro:७१ दिवसापासून फरार असलेले माजी नगराध्यक्ष दोसानी यांना अटक....!

नांदेड : राजकीय वादातून झालेल्या मारहाण नंतर गेल्या ७१ दिवसांपासून फरार असलेले माहचे माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानीसह अन्य एका आरोपीला रविवारी यवतमाळ पोलिसांनी अटक करून माहूर पोलिसांच्या स्वाधीन केले . गेल्या दोन महिन्यांपासून दोसानीसह अन्य आरोपी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते . परंतु , त्यांना कुठल्याही कोर्टात दिलासा मिळाला नव्हता . शेवटी त्याला आज अटक झाली .
Body:७१ दिवसापासून फरार असलेले माजी नगराध्यक्ष दोसानी यांना अटक....!

नांदेड : राजकीय वादातून झालेल्या मारहाण नंतर गेल्या ७१ दिवसांपासून फरार असलेले माहचे माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानीसह अन्य एका आरोपीला रविवारी यवतमाळ पोलिसांनी अटक करून माहूर पोलिसांच्या स्वाधीन केले . गेल्या दोन महिन्यांपासून दोसानीसह अन्य आरोपी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते . परंतु , त्यांना कुठल्याही कोर्टात दिलासा मिळाला नव्हता . शेवटी त्याला आज अटक झाली .

दोसानी यांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ शनिवारी संपला आणि रविवारी त्यांना पोलिसांनी पकडले. दरम्यान अटक केल्यानंतर दोसानीला माहूर येथे आणले असता , कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नांदेडहून खास दंगल नियंत्रण पथक बोलावण्यात आले होते. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या व्यक्तिगत टिप्पणीनंतर माहूर येथे दि . १९ एप्रिल २०१९ रोजी जि . प . उपाध्यक्ष समाधान जाधव व भाजपाचे युवानेते सुमित राठोड यांच्यात वाद झाला होता .
याप्रकरणी सुमित राठोड यांच्या तक्रारी वरून जबर मारहाण व मौल्यवान ऐवज लंपास केल्याच्या गुन्हात फरार असलेल्या आरोपपैकी माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी ( वय ३७ वर्षे, रा. माहूर ) व . उकंडराव मोहन जाधव ( वय ४० वर्षे, रा . लोकरवाडी ता . माहूर ) यांना दि . ३० रोजी दुपारी दोन वाजता यवतमाळच्या स्थानीक गुन्हे शाखेने दाते चौक यवतमाळ येथे अटक करून माहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
उपरोक्त दोघे यवतमाळ येथील दाते चौकात एका हेअर सलूनमध्ये दाढी करत असल्याची माहिती मिळाल्यावरून यवतमाळ स्थानिक गुन्हा शाखेने सापळा रचून त्यांना अटक केली. याबाबत यवतमाळ पोलिसांनी माहूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर माहर येथून तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके, पो. कॉ. लिंगायत यांनी यवतमाळ येथून आरोपींना स्था . गु . शा . यवतमाळकडून ताब्यात घेऊन सायंकाळी ७ वा च्या दरम्यान पो . स्टे . माहूर येथे आणले. दरम्यान शहरात शांततापूर्ण वातावरण राहण्यासाठी नांदेड येथून दंगल नियंत्रण पथक बोलावण्यात आले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सदर प्रकरणातील एकूण २१ आरोपींपैकी ६ आरोपी यापूर्वीच स्वतःहून माहुर पोलीस स्टेशनला हजर झाले होते. अटक केलेल्या २ आरोपीनंतर रितेश चरण राठोड ( वय २० वर्षे , रा . आसोली ) हा दि . ३० रोजी रात्री नऊ वाजता स्वतःहन माहूर पो . स्टे . ला हजर झाला असून जि . प . उपाध्यक्ष समाधान जाधवसह एकूण १२ आरोपी अद्याप फरार आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.