ETV Bharat / state

उदरनिर्वाहासाठी परमिंदर कौर यांची जिद्द; नऊ वर्षांपासून नांदेडातील रामघाट स्मशानभूमीत वास्तव्य - नांदेड रामघाट स्मशानभूमी

म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची तुलना कुणाशीही करता येत नाही. नांदेड जुन्या शहरातील राम घाट या स्मशानभूमीतीत गेल्या नऊ वर्षांपासून मोठ्या धाडसानं आणि ध्यैर्याने राहणारी ही महिला कोरोना काळातही सरण रचण्यापासून, अंत्यसंस्कारानंतरची राख साफ करण्यापर्यंतचे काम करत मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करत आहे.

उदरनिर्वाहासाठी परमिंदर कौर यांची जिद्द; नऊ वर्षांपासून नांदेडातील रामघाट स्मशानभूमीत वास्तव्य

author img

By

Published : May 9, 2021, 11:19 AM IST

नांदेड : स्मशानभूमीत काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याची जबाबदारी एका महिलेने स्वतःवर घेतली आहे. मुलांचे शिक्षण आणि संसाराचा गाडा चालवण्यासाठी ही महिला अक्षरशः सरण रचणे आणि प्रेताची राख गोळा करण्याचे काम करते. मागील नऊ वर्षांपासून परमिंदर कौर ह्या नांदेड शहरातील राम घाट स्मशानभूमीत काम करत आहेत. पाहुयात मातृ दिनानिमित्त विशेष वृत्तांत

उदरनिर्वाहासाठी परमिंदर कौर यांची जिद्द; नऊ वर्षांपासून नांदेडातील रामघाट स्मशानभूमीत वास्तव्य

मुलांच्या शिक्षणासाठी एका आईची धडपड
म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची तुलना कुणाशीही करता येत नाही. नांदेड जुन्या शहरातील राम घाट या स्मशानभूमीतीत गेल्या नऊ वर्षांपासून मोठ्या धाडसानं आणि ध्यैर्याने राहणारी ही महिला कोरोना काळातही सरण रचण्यापासून, अंत्यसंस्कारानंतरची राख साफ करण्यापर्यंतचे काम करत मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करत आहे.

नऊ वर्षांपासून स्मशानभूमीत काम
आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने परमिंदर कौर यांनी मिळेल ते काम करण्याचा निर्धार केला. नांदेड जुन्या शहरातील रामघाट स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या परमिंदर कौर या आपल्या 65 वर्षांच्या सासू, पती, एक मुलगा आणि एका मुलीसह राहतात. मूळच्या पंजाबच्या अमृतसर येथील त्या आहेत. कामाच्या शोधत निघालेल्या परमिंदर कौर यांना नांदेडात यावं लागलं. नांदेड मागील नऊ वर्षांपासून स्मशानभूमीतीत आपल्या कुटुंबासोबत त्या राहातात. परमिंदर कौर यांच शिक्षण दहावीपर्यंत झालयं. पती गुरुदेवसिंघ मल्ली हे अशिक्षित आहेत. रजिंदर कौर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नोंदणी करतात. तर सरण रचणे, राख काढणे अशी सर्व कामं हे कुटुंब करत आहे. तुटपुंज्या मानधनात परमिंदर कौर या संसाराचा गाडा हाकत आहे.

कौर परिवार स्मशानभूमीत करते वास्तव्य
स्मशानभूमी म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते, अशा ठिकाणी परमिंदर कौर यांचे कुटुंब वास्तव्य करते. पत्र्याच्या खोलीच्या एका शेडमध्ये आपला उदरनिर्वाह करतात. त्या शेडमध्ये एक लाईट आहे. तिथेच किचन, तिथेच बेड. परमिंदर यांचा पूर्ण परिवार एकाच शेडमध्ये राहतात. परमिंदर कौर ह्या अंत्यसंस्काराचे सर्व कामे करतात. परमिंदर यांच्या कामात पती गुरुदेवसिंघ मल्ली आणि त्यांचा मुलगाही हातभार लावतात.

परमिंदर कौर यांच्या धाडसाला सलाम
परमिंदर कौर यांच्या हिम्मतीला धेर्याला दाद देत रामघाटची व्यवस्थापन समितीही त्यांच्या कुटुंबास चांगले सहकार्य करते. हलाखाची परिस्थिती असल्याने परमिंदर कौर यांचे बाळंतपणही याच ठिकाणी झाले. या ठिकाणी जन्मलेल्या आपल्या मुलीला त्यांनी खुशी हे नाव दिलं. परमिंदर कौर यांच्या धाडसाचं धेर्याच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. परमिंदर कौर याच्या सेवाभाव कार्यास सलाम.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.