ETV Bharat / state

Painganga River: मुसळधार पसवामुळे पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली; ३५ वानरं २ दिवसांपासून झाडावरचं - पैनगंगेच्या बाजूला ३५ वानरं २ दिवसांपासून झाडावरचं अडकले

मुसळधार पसवामुळे पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे. या पुराचे पाणी सिरपल्ली नाल्याला आल्याने येथील झाडावर ३० ते ३५ माकड गेल्या दोन दिवसांपासून अडकून पडले होते. त्या माकडांना नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव रक्षक कट्टी व त्यांच्या पथकाने आज रेस्क्यू ऑपरेशन करून खाण्यासाठी साहित्य ठेवल्यामुळे सुखरूप आहेत. दरम्यान, आणखी काही वानर अडकून पडले आहेत. त्यांना काढण्याचे काम सुरु आहे.

मुसळधार पसवामुळे पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

author img

By

Published : Jul 15, 2022, 3:18 PM IST

नांदेड - गेल्या ९ दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पसवामुळे पैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे. या पुराचे पाणी सिरपल्ली नाल्याला आल्याने येथील झाडावर ३० ते ३५ माकड गेल्या दोन दिवसांपासून अडकून पडले होते. त्या माकडांना नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव रक्षक कट्टी व त्यांच्या पथकाने आज रेस्क्यू ऑपरेशन करून खाण्यासाठी साहित्य ठेवल्यामुळे सुखरूप आहेत. दरम्यान सकाळी रेस्क्यूसाठी येणाऱ्या पथकाला रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणीतून पाण्यातून येथे येण्यास ४ तास लागले होते. आणखी काही वानर अडकून पडले आहेत. त्यांना काढण्याचे काम सुरु आहे.

माकडं रेस्क्यू ऑपरेशनमुळे सुखरूप - हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या सिरपल्ली, शेलोडा भागाला नदीच्या पाण्याचा पुराणे वेढा घातला आहे. या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने परिसरातील संपूर्ण शेती जलमय झाली आहे. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा पुराचा फटका वन्य प्राण्यांनाही बसला असून, पावसाळ्यात घर नसल्याने झाडावर थांबणरे ३० ते ३५ वानर येथील पुरामुळे २ दिवसांपासून अडकून पडले आहेत. दरम्यान, खाण्यासाठी काहीच मिळत नसल्याने व्याकूळ झाले आहेत.

वन विभाग अधिकाऱ्यांना याची माहिती - ही बाब गावचे युवक प्रकाश पाटील, अरविंद पाटील, जेष्ठ नागरिक शिवाजी पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, आ. माधराव पाटील जळगावकर यांच्या निदर्शनास माकडे पुरामुळे अडकून पडली असल्याची बाब आणून दिली. तसेच, हिमायतनगर भाजप तालुका अध्यक्ष आशिष सकवान यांना फोन करून वन विभाग अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यामुळे आज रेस्क्यू ऑपरेशनसाठी वन्यजीव रक्षक कट्टि व त्यांच्ये सहकारी पथक येथे दाखल झाले. त्यांना येथे येण्यासाठी पुराचे पाणी असल्याने ४ तास वेळ लागला. वनविभागाचे पथक दाखल झाल्यानंतर दोरखंडाच्या साहाय्याने शर्तीचे प्रयत्न करून अखेर पुराच्या पाण्यातील झाडावर अडकून पडलेल्या वानरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नागरिक जास्त जमल्यामुळे काही वानर झाडावर थांबून आहेत.

पुरात अडकलेल्या वानरांना जीवदान मिळाले - ही कामगिरी केशव वाबळे उपवसंरक्षक नांदेड यांचे मार्गदर्शन खाली सहायक वनसंरक्षक ठाकूर साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण, वन्य जीव रक्षक कट्टी सर, वनपाल अमोल कदम, कोलते, विभुते, मेतकर, वनरक्षक केंद्रे, चातसे, खलसे, सोने, अमृतवर, गिते यांनी केली. यासाठी सिरपल्ली गावातील युवक दयानंद जाधव, संतोष जाधव यांनी वन विभागाला मदत केली. यामुळे पुरात अडकलेल्या वानरांना जीवदान मिळाले आहे. आणखी काही वानर अडकून पडली असून, वृत्त लिहीपर्यंत ती वानर काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

वन विभागाचे दोन कर्मचारी येथे तैनात - या संदर्भात माहिती घेतली असता, पलीकडील बाजूला नदीचे पाणी अलीकडे २५ फूट पाणी आहे. सध्या पैनगंगेचे पाणी ओसरत आहे. त्यामुळे वानरांच्या त्यांच्या खाण्या पिण्याची सोय करण्यात आली आहे. येथे उपस्थित असलेले नागरिक गराडा करत असल्याने वानर जवळ येत नाहीत, त्यामुळे काही वानर झाडावर आहेत. उपस्थित नागरिक गेल्यावर सर्व वानर आपोआप येथून बाहेर येतील. यासाठी वन विभागाचे दोन कर्मचारी येथे तैनात ठेवले असल्याची माहिती वनपाल अमोल कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा - शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी धक्का; नामांतराच्या निर्णयाला दिली स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.