ETV Bharat / state

पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या नाही, तर कॉर्पोरेटसह बँकीग क्षेत्राच्या फायद्याची - पी. साईनाथ

गेल्या 60 वर्षांत मराठवाड्यातील तापमानात 60 टक्के वाढ झाली. वाढत्या तापमानाबाबत ग्रामीण भागात राहणाऱ्या पत्रकारांनी अधिक प्रकाश टाकण्याची गरज आहे. शहरी भागातील पत्रकार त्या वातावरणात राहत नसल्याने त्यांना याबाबत तेवढे अनुभवाने लिहिता येणार नाही, असेही साईनाथ यांनी सांगितले.

पी. साईनाथ
author img

By

Published : Aug 18, 2019, 3:03 PM IST

नांदेड - पंतप्रधान पीक विमा योजना ही केवळ कॉर्पोरेट व बँकिंग क्षेत्राच्या फायद्याची आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा काहीही फायदा नाही, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली आहे.

नांदेड येथील भारतीय पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात पी. साईनाथ यांनी ग्लोबल वॉर्मिंग व पीक विमा योजना यावर प्रकाश टाकला.

पीक विमा योजना कॉर्पोरेट व बँकीग क्षेत्राच्या फायद्याची

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पहिल्या वर्षी 20 हजार कोटी, दुसऱ्या वर्षी 22 हजार कोटी व तिसऱ्या वर्षी 26 हजार कोटी रुपये जमा झाले. हा सर्व पैसा सार्वजनिक क्षेत्रातील आहे. ही गुंतवणूक केंद्र व राज्य सरकारने केली. यात शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेला पैसा वेगळा आहे. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून व्यक्तिश: प्रिमियम घेतला जातो. तथापी नुकसान भरपाई देताना क्षेत्र गृहीत धरून त्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाते. त्यातील 80 टक्के शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडून फेटाळले जातात. शेतकऱ्यांना कोणत्या कंपनीचा विमा काढायचा हे निवडण्याचाही अधिकार नाही. ज्या कंपनीचा विमा काढला त्या कंपनीचे जिल्ह्यात ऑफिसही नसते. तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न असतो. केवळ खासगी उद्योजकांच्या फायद्याची ही योजना असून शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा होत नाही, असे पी. साईनाथ म्हणाले.

या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, आमदार डी. पी. सावंत, राम पाटील रातोळीकर, सुभाष साबणे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, पत्रकार प्रसाद काथे, सिद्धार्थ शर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Intro:पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या नाही तर कॉर्पोरेट व बँकीग क्षेत्राच्या फायद्याची- पी.साईनाथ

नांदेड: पंतप्रधान पीक विमा योजना ही केवळ कॉर्पोरेट व बँकिंग क्षेत्राच्या फायद्याची असून त्यात शेतकऱ्यांचा काहीही फायदा नाही अशी टीका ज्येष्ठ पत्रकार पी . साईनाथ यांनी केली.
Body:पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या नाही तर कॉर्पोरेट व बँकीग क्षेत्राच्या फायद्याची- पी.साईनाथ

नांदेड: पंतप्रधान पीक विमा योजना ही केवळ कॉर्पोरेट व बँकिंग क्षेत्राच्या फायद्याची असून त्यात शेतकऱ्यांचा काहीही फायदा नाही अशी टीका ज्येष्ठ पत्रकार पी . साईनाथ यांनी केली.

नांदेड येथील भारतीय पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात पी . साईनाथ यांनी ग्लोबल वॉर्मिंग व पीक विमा योजना यावर प्रकाश टाकला. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पहिल्या वर्षी २० हजार कोटी, दुसऱ्या वर्षी २२ हजार कोटी व तिसऱ्या वर्षी २६ हजार कोटी रुपये जमा झाले. हा सर्व पैसा सार्वजनिक क्षेत्रातील आहे. ही गुंतवणूक केंद्र व राज्य सरकारने केली . यात शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेला पैसा वेगळा आहे. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून व्यक्तिश : प्रीमियम घेतला जातो. तथापि नुकसान भरपाई देताना मात्र क्षेत्र गृहीत धरून त्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाते . ८० टक्के शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडून फेटाळले जातात. शेतकऱ्यांना कोणत्या कंपनीचा विमा काढायचा हे निवडण्याचाही अधिकार नाही. ज्या कंपनीचा विमा काढला त्या कंपनीचे जिल्ह्यात ऑफिसही नसते. तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न असतो. केवळ खासगी उद्योजकांच्या फायद्याची ही योजना असून शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा होत नाही, असेही पी . साईनाथ यांनी सांगितले. गेल्या ६० वर्षांत मराठवाड्यातील तापमानात साठ टक्के वाढ झाली. वाढत्या तापमानाबाबत ग्रामीण भागात राहणाऱ्या पत्रकारांनी अधिक प्रकाश टाकण्याची गरज आहे. शहरी भागातील पत्रकार त्या वातावरणात राहत नसल्याने त्यांना याबाबत तेवढे अनुभवाने लिहिता येणार नाही , असेही साईनाथ यांनी सांगितले.
या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस . एम . देशमुख, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, आमदार डी . पी . सावंत, राम पाटील रातोळीकर, सुभाष साबणे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक संजय जाधव, पत्रकार प्रसाद काथे, सिद्धार्थ शर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.