ETV Bharat / state

नांदेड : हिमायतनगर येथे वीज कोसळली, एक व्यक्ती गंभीर जखमी - सुरेश परमेश्वर जखमी हिमायतनगर

मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस झाला. दरम्यान शहरानजिक एका झाडावर वीज कोसळली, याचवेळी घराकडे येत असलेला शेतकरी येथून येत असताना कोसळलेल्या विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

Suresh Parmeshwar injured Himayatnagar
व्यक्ती जखमी
author img

By

Published : Jun 12, 2022, 2:07 PM IST

नांदेड - मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस झाला. दरम्यान शहरानजिक एका झाडावर वीज कोसळली, याचवेळी घराकडे येत असलेला शेतकरी येथून येत असताना कोसळलेल्या विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. सुरेश परमेश्वर टोमके (वय 30) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा - Shamsunder Shinde criticize sanjay raut : संजय राऊत हे महाभारतातले संजय आहेत का? - आमदार शामसुंदर शिंदे

वीज जोरात कडाडली आणि वाशिकर यांच्या शेतानजिक रस्त्यावरील झाडावर कोसळली. खडकी पांदण रस्त्यावरील शेताकडून शेतकरी गावाकडे येत असताना कोसळलेल्या विजेचा जबरदस्त शॉक शेतकऱ्याला लागला. यामुळे शेतकऱ्याच्या कमरेपासून खालील भागाला इजा झाली आहे. यात त्यांचे पाय भाजून गेले आहेत. हा प्रकार लक्षात येताच तातडीने नागरिकांनी जखमी शेतकऱ्यास ग्रामीण रुग्णालयात हलविले. येथे वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केला. परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलवण्यात आले.

हेही वाचा - Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणी हत्या प्रकरणातील 9 आरोपींना 4 दिवसांची कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.