नांदेड - बेल्लुर (बु) कंदाकुर्ती (ता.धर्माबाद) येथील पुलावरून उडी मारून एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. तर याच पुलावरून पाणी पाहत असताना तोल गेल्याने दुसऱ्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी घडल्या. २२ नोव्हेंबरला या दोन्ही तरुणांचे मृतदेह आढळले.
कामाच्या विवंचनेतून केली आत्महत्या -
धर्माबाद तालुक्यातील बेल्लुर (बु) गावाजवळच असलेल्या कंदाकुर्ती येथील सुशिक्षित तरूण प्रविण विठ्ठल खंदारे (वय २०) हा हैदराबाद येथे कंपनीत काम करत होता. लॉकडाऊनमध्ये तो गावी आला होता. त्यानंतर कुठे जॉब मिळत नसल्याने बेरोजगारीला कंटाळून प्रविण खंदारे याने गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पाण्यात तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू -
याच दिवशी धर्माबाद तालुक्यातील समराळा येथील रहिवासी असलेले परशुराम भिमराव जाधव (वय३५) हे कंदाकुर्ती येथे पाहुण्याकडे आले होते. कंदाकुर्ती येथील मुलगा नदीत पडला असे ऐकण्यात आल्याने परशुराम जाधव यांने गोदावरी नदीवर येऊन खाली पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा अचानक तोल गेल्याने नदीत पडून मृत्यू झाला. परशुराम जाधव यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, तीन बहीणी, पत्नी, चार मुले असा परिवार आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बेरोजगारीला कंटाळून तरुणाची गोदावरी नदीत आत्महत्या तर दुसऱ्याचा पाण्यात तोल गेल्याने मृत्यू
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात एकाच दिवशी दोन तरुणांचा मृत्यू झाला. एकाने आत्महत्या केली तर दुसऱ्याचा पाण्याचा तोल गेल्याने मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह मिळाले असून त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहेत.