ETV Bharat / state

नांदेड तहसीलमार्फत वाळू माफियाविरुद्ध धडक मोहीम; ५४ तराफे केले नष्ट - वाळू माफियांवर नांदेड तहसीलची कारवाई बातमी

गोदावरी पात्रात वाजेगाव येथे १३, ईदगाह येथे १८ व मरघाट येथे २३ मोठे तराफेद्वारे अवैध वाळूउपसा होत होता. नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या पथकाने हे तराफे नष्ट करण्याची कारवाई केली. अवैध उपसा करणारी बोट व वाहतूक करणारे टिप्पर पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे. यापुढेही दंडात्मक व फौजदारी कारवाई चालूच राहील, अशी माहिती प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.

नांदेड तहसीलमार्फत वाळू माफियाविरुद्ध धडक मोहीम

author img

By

Published : Jul 7, 2020, 3:10 PM IST

नांदेड : तहसीलच्या चार पथकांनी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उतरुन मंगळवारी पहाटे वाळूमाफियांविरुद्ध धडक मोहीम राबवली. या मोहिमेत ईदगाह, मरघाट, वाजेगाव व नावघाट गोदावरी घाटावरील तब्बल ५४ तराफे नष्ट करण्यात आले. या मोहिमेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गोदावरी पात्रात वाजेगाव येथे १३, ईदगाह येथे १८ व मरघाट येथे २३ मोठे तराफेद्वारे अवैध वाळूउपसा होत होता. नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या पथकाने हे तराफे नष्ट करण्याची कारवाई केली. हे तराफे नष्ट करण्यासाठी पथकाने १२ हमाल आणले होते. सदर तराफे खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने मुगाजी काकडे स्वतः बोट घेऊन नदीत उतरले होते. यावेळी सर्वच तलाठी व मंडळ अधिकारी हजर होते. या कारवाईत मंडळ अधिकारी कोंडीबा नागरवाड, गजानन नांदेडकर, चंद्रकांत कंगळे, खुशाल घुगे, बालाजी जेलेवाड व अनिरुद्ध जोंधळे, अनिल धुळगंडे, खुशाल घुगे, चंद्रकांत कंगळे, तलाठी उमाकांत भांगे, आकाश कांबळे, रवी पल्लेवाड, ईश्वर मंडगीलवार, शिवलिंग गंटोड, संताजी देवापूरकर, सचिन नरवाडे, मंगेश वांगीकर, विजय रणविरकर, राहुल चव्हाण, वाहनचालक जहिरोद्दीन यांनी भाग घेतला. या कारवाईत १६ ब्रास वाळू जप्त करून जायमोक्यावर लिलाव केला.

महिला अधिकाऱ्यांनी लढविला मोहिमेचा किल्ला

यावेळी महिला तलाठी कविता इंगळे, ज्योती निवडंगे, सोनाली काकडे, रेखा राठोड, अश्विनी सोलापूरे व रेखा मंडगीलवार यांनी स्वतः बोटीत बसून नावघाट येथे कारवाई केली. तसेच पहाटे मौजे नागापूर येथे प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी खुशाल घुगे, अनिल धुळगंडे, तलाठी कैलास सूर्यवंशी, मनोज देवणे व राहुल चव्हाण यांनी अवैध उपसा करणारी बोट व वाहतूक करणारे टिप्पर पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे. महसूल प्रशासन जरी कामात व्यस्त असले तरी, वाळूमाफियावर तेवढेच लक्ष ठेवून आहे. यापुढेही दंडात्मक व फौजदारी कारवाई चालूच राहील, अशी माहिती प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.