ETV Bharat / state

Pratibha Vathore : आई-वडिलांचे छत्र हरपले, भावाची पण साथ सुटली.. मात्र न डगमगता तिने 'नीट' मध्ये मिळवले यश! - प्रतिभा वठोरे नांदेड

नांदेड जिल्ह्यातील प्रतिभा वाठोरे या विद्यार्थीनीने हलाखीची परिस्थिती व कुटुंबाच्या आधाराशिवाय अत्यंत अवघड अशा 'नीट' परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तिची ही कहाणी लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

Pratibha Vathore
प्रतिभा वाठोरे
author img

By

Published : Jun 18, 2023, 6:04 PM IST

प्रतिभा वाठोरे

नांदेड : नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हरडफ येथील प्रतिभा वाठोरे या विद्यार्थीनीने नीट परीक्षेत 584 गुण मिळवत आपल्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे. प्रतिभाचे कुटुंब शेतमजुरांचे आहे. तिचे आई - वडील आणि एक भाऊ मोलमजुरी करून चरितार्थ चालवत होते. प्रतिभा लहाणपणापासूनच चुणचुणीत आणि हुशार आहे. तिने आयुष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मुलीचे स्वप्न साकार करण्यासाठी वडील विनायक वाठोरे यांनी जीवापाड मेहनत घेतली. मोलमजुरी करून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. मात्र अचानक प्रतिभाच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर अल्पावधीतच तिच्या वडिलांचेही निधन झाले.

आई - वडिलांनंतर भावाचाही मृत्यू : आई - वडिलांचे छत्र हरपल्यानंतर ग्रामस्थांनी पोरक्या झालेल्या प्रतिभा आणि तिच्या भावाच्या पाठीशी मदतीची भिंत उभारली. मात्र एक दिवस प्रतिभाच्या भावाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. आधी आई - वडील आणि त्यानंतर भावाच्या मृत्यूनंतरही प्रतिभाने डॉक्टर होण्याचे स्वप्न सोडले नाही. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती जिद्दीने पेटली. प्रतिभाची डॉक्टर होण्याची ही जिद्द पाहून कृषी अधिकारी भारत वाठोरे, प्रा. महेंद्र नरवाडे, प्रा. देवराव वाठोरे, शिक्षक राहुल वाठोरे, यशवंत वाठोरे, प्रा. भास्कर दवणे, संजय वाठोरे हे तिच्या पाठीशी उभे राहिले.

पहिल्याच प्रयत्नात 584 गुण मिळवले : त्यानंतर प्रतिभा नांदेडला आली. मात्र कोणत्याही खाजगी क्लासेसची फीस भरणे शक्य नसल्याने तिने स्वत:हून अभ्यास सुरू केला. मित्र - मैत्रिणींच्या नोट्सचा वापर करत तिने 'नीट'ची तयारी सुरू केली. तिच्या या जिद्दीला यश आले आणि तिने पहिल्याच प्रयत्नात 584 गुण मिळवत यशाचा झेंडा फडकवला.

माझ्या आई - वडिलांनी मी डॉक्टर व्हावे असे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आई - वडिलांपाठोपाठ भावाच्या मायेलाही मी पोरकी झाली. त्यानंतर आई - वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी जिद्दीने पेटले. यासाठी मला अनेकांचे अर्थसहाय्य लाभले. त्यामुळेच मला डॉक्टर होण्याचे स्वप्न गाठता आले. डॉक्टर झाल्यानंतर माझी गोरगरिबांसाठी आणि समाजासाठी सेवा करण्याची इच्छा आहे. - प्रतिभा वाठोरे

हेही वाचा :

  1. Akash Gaud : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत लातूरच्या आकाश गौडची वेटलिफ्टिंगमध्ये भरारी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.