नांदेड - दिल्ली येथील कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी नांदेड सचखंड गुरुद्वाराकडून गुरुद्वाऱ्याचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई यांच्या नेतृत्वाखाली 50 सेवेकऱ्यांचा जत्था रवाना झाला आहे. गुरुद्वाराचे प्रमुख संतबाबा कुलवंतसिंघजी, संत बाबा ज्योतिनदारसिंघजी, संत बाबा रामसिंघजी, बाबा बलविंदरसिंघ यांनी जत्थ्याला निरोप दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात लंगर साहित्य आणि दोन रुग्णवाहिकांसह दोन मेडीकल टीम घेऊन हा जत्था रवाना झाला. दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना लंगर व वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम हे सर्व सेवेकरी करणार आहेत.
हेही वाचा - गुरुद्वारातील दर्शनानंतर बच्चू कडू पलवलकडे रवाना; रॅलीला प्रतिसाद, जागोजागी स्थानिकांकडून स्वागत
सात वाहनांचा ताफा दिल्लीला रवाना
केंद्राने केलेला नवा कृषी कायदा रद्द करावा, यासाठी दिल्लीच्या सिंधू सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने लंगर सामग्रीसह औषधे, उबदार चादरी घेवून गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई हे सात वाहनांच्या ताफ्यासह मंगळवारी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.
दोन ट्रक धान्य व रुग्णवाहिका सेवा
गुरुद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंतसिंघजी, संत बाबा बलविंदरसिंघजी, ज्योतिंदरसिंघजी, बाबा रामसिंघजी धुपीया, काश्मिरसिंघजी, गुरमितसिंघजी, जगिंदरसिंघजी, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघजी वाधवा यांच्या उपस्थितीमध्ये गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघजी बुंगई, बोर्डाचे सहाय्यक अधिक्षक रविंद्रसिंघ कपूर यांच्यासह ५० कर्मचारी दोन ट्रक धान्य, दोन रुग्णवाहिका व इतर वाहने घेऊन ते रवाना झाले आहेत.
हेही वाचा - Bharat Bandh : महाराष्ट्रात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद