नांदेड- जिल्ह्यातील बियाणे खते व कीटकनाशके यांचे उत्पादन, विक्री, वाहतूक व साठवणूक यांना बंदमधून वगळण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली. याआधी कोरोना साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार यावर बंदी घालण्यात आली होती.
जिल्ह्यातील बियाणे खते व कीटकनाशके यांचे उत्पादन, विक्री, वाहतूक व साठवणूक या सर्वांवर 14 एप्रिलपर्यंत बंदी घातली होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी लागू असल्यामुळे हा निर्णय झाला होता. परंतु, आता सुधारित आदेशानुसार, ही बंदी उठवली आहे. आता जिल्ह्यातील सर्व बियाणे खते व कीटकनाशके या कृषी उपयोगी साहित्याचे उत्पादन, साठवणूक वाहतूक व पॅकिंग याचे कारखाने व विक्री चालू राहणार आहे. हा आदेश लागू केल्याचे डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले.