नांदेड Nanded Crime News : नांदेड शहरातील आयटीआय इमारतीच्या पाठीमागं शुक्रवारी (17 नोव्हेंबर) एका 17 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाची कवटी पूर्णपणे जनावरांनी खाल्लेली होती. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण आंबेडकरनगर इथल्या रहिवासी आहे. तसंच मागील चार दिवसांपासून तो घरातून बेपत्ता होता. दरम्यान, याप्रकरणी मृत तरुणाच्या बहिनीनं केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर या संदर्भात तपास करत शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीस अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिली आहे.
टॅटूवरुन पटवली ओळख : यासंदर्भात अधिक माहिती देत पोलीस निरीक्षक मोहन भोसले म्हणाले की, शुक्रवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास आम्हाला हवालदाराचा फोन आला होता. त्यानं आयटीआय इमारतीच्या पाठीमागं झाडीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. तसंच या तरुणाचा खून झाल्याचं निदर्शनास येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर तात्काळ शिवाजीनगर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, तपासावेळी तरुणाच्या हातावर एस. पी. नावाचा टॅटू दिसला. या टॅटूवरुन पोलिसांनी त्याची ओळख पटवली. प्रतीक महेंद्र शंकपाळ (रा. आंबेडकर) मृताचं नाव असून गेल्या चार दिवसांपासून तो घरातून बेपत्ता होता. यापूर्वीही अनेक वेळा तो अशाच प्रकारे घरातून गायब झाला होता.
आरोपीला अटक : या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 411/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकानं तपासाची चक्रे फिरवत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन आरोपी मोहम्मद फंक्शन हॉल खडकपुरा, नांदेड इथं असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी आवेस इस्माईल पठाण (रा. बालाजी नगर,हिंगोली नाका,नांदेड) याला अटक केली.
यांनी केली कारवाई : दरम्यान, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक रविकुमार वाहुळे, पांडुरंग माने, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहू, माधव केंद्रे, गुंडेराव करले, विठ्ठल शेळके ज्वालासिंघ बावरी, देवा चव्हाण, गजानन वयनवाड आदींनी केली. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि रविकुमार वाहुळे, पांडुरंग माने, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहू, माधव केंद्रे, गुंडेराव करले, विठ्ठल शेळके ज्वालासिंघ बावरी, देवा चव्हाण, गजानन वयनवाड आदींनी केली.
हेही वाचा -