ETV Bharat / state

शेतातील नाल्याच्या वादातून सगरोळीत एकाचा खून;डोक्यात घातला कुऱ्हाडीचा घाव - तीन आरोपींना अटक

शेताजवळून पावसाच्या पाण्याचा नाला काढण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून सगरोळीत एकाचा खून झाला. बिलोली पोलिसांनी या प्रकरणी फरार आरोपींना अटक केली आहे.

shankarrao mahajan
मृत शंकरराव महाजन
author img

By

Published : Jun 3, 2020, 12:15 PM IST

नांदेड- शेताजवळून पावसाच्या पाण्याचा नाला काढण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून शंकरराव महाजन यांचा डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून झाल्याची घटना सगरोळी शिवारात घडली आहे. या घटनेतील आरोपीविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीना अटक केली आहे.

नाल्याच्या वादातून सगरोळीत एकाचा खून

सगरोळी येथील शेतकरी शंकरराव हणमंतराव महाजन वय ६५ वर्षे आणि परशुराम दत्तू इलतेपोड वय ४५ वर्षे व त्याची दोन मुले यांच्यात शेतातील पावसाच्या पाण्याचा नाला काढण्यावरुन वाद झाला. या किरकोळ वादात आरोपी परशुराम इलतेपोड याने महाजन यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत शंकरराव महाजन यांचा मुलगा माधव महाजन यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपी इलतेपोडसह अन्य दोन आरोपी विरुध्द बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फरार मारेकरी आरोपींना मंगळवारी दुपारी माचनूर येथून अटक करण्यात आली असून, सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्दोधन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.