नांदेड MPSC Exam Result : अनेक तरुणांचं स्पर्धा परीक्षेतून (Hadgaon Taluka) अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. (MPSC Exam) अनेकजण त्यासाठी अहोरात्र (Sagar Shinde) प्रयत्न करतात. सातत्याने येणाऱ्या अपयशावर मात करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीनं यशाचं शिखर गाठतात. असे अधिकारी आणि त्यांचा प्रवास समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो. अशाच संघर्षमय प्रवासातून यशोशिखर गाठणारा तरुण म्हणजे सागर शिंदे होय. (Ministry Clerk) नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील माटाळा हे गाव अगदी टोकाचं गाव. (Tax Assistant Officer) या गावात एकही व्यक्ती शासकीय नोकरीत अधिकारी म्हणून नाही. म्हणून सागरने अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. पाहुयात तब्बल 23 वेळा अपयश येऊन अधिकारी झालेल्या तरुणाची कहाणी.
सागरच्या यशाचे कौतुकच : सतत अपयश पदरात पडलं की, काही जण लढायचं सोडून देतात. परंतु हदगाव तालुक्यातील माटाळा गावातील सागर नानाराव शिंदे या युवकाच्या हाती तब्बल 23 वेळा अपयश आलं. परंतु मित्र आणि घरच्यांच्या पाठबळावर घेतलेल्या मेहनतीला अखेर यश आलं. 24 व्या वेळी सागरनं यशाला गवसणी घातली. महत्त्वाचं म्हणजे सागरने एका वर्षात शासकीय सेवेतील दोन परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. एक म्हणजे एमपीएससी मधून सहाय्यक अधिकारी आणि दुसरं म्हणजे मंत्रालयातील लिपिक पद. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्याच्या या यशाचे कौतुक केले जात आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीवरच : सागर शिंदेने यापूर्वी विविध पदांसाठी एमपीएससीची २३ वेळा परीक्षा दिली. मात्र, अपयशाचा सामना करावा लागला. या परिस्थितीत मित्रमंडळी आणि घरच्यांनी धीर दिला आणि पुढे मेहनत घेतली. अखेर २४व्या प्रयत्नात कर सहायक अधिकारी व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा तो उत्तीर्ण झाला. सामाजिक बांधिलकी म्हणून मी कर सहायक अधिकारी होण्याचा पर्याय निवडला. सागरला पुढे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील, भाऊ मजुरी करून घराचा उदरनिर्वाह करतात. मजुरी करून सागर शिंदे याला त्यांनी शिक्षणासाठी पैसे पुरविले. अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवून सागरनेही प्रयत्न केले आणि कुटुंबियांच्या पाठबळाचे चीज केले. अनेक वर्षे अभ्यास करून त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी केली होती. पुरेसे मार्गदर्शन न लाभल्याने त्याला अपयश येत होते. या वेळेस मात्र सागरने जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत यश प्राप्त केले.
मजुरी करून पुरविले शिक्षणासाठी पैसे: सागर शिंदेच्या यशामुळे गावातील पहिला अधिकारी बनण्याचा मान त्याला मिळाला. गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत केले. अत्यंत गरीब परिस्थितीत वडिलांनी लोकांकडे मजुरी करून सागरच्या शिक्षणाला पैसे पुरविले. सागरच्या मित्र परिवारानेही मोठी मदत केली. यात सागरने मेहनत घेऊन मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे.
हेही वाचा: