नांदेड - शहरातील हडको परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिच्या नातेवाईसासह एक तरुणाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखस केली होती. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं ४३९/१९ कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे उपनिरीक्षक आर.एम.घोळवे यांनी सांगितले.