ETV Bharat / state

हिमायतनगरमध्ये वाटमारी ; दोघांना लुटले, व्यापारी वर्गात धास्ती - सिरंजनी रोड

हिमायतनगरमध्ये वाटमारीची घटना घडली असून दोन व्यापाऱ्यांना लुटण्यात आले आहे. यामुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

merchant
author img

By

Published : Feb 2, 2019, 11:50 AM IST

नांदेड - सिरंजनी रोडवर ३१ जानेवारीला रात्री साडे नऊच्या दरम्यान, काही अज्ञात दरोडेखोरांनी २ व्यापाऱयांकडील ९० हजारांचा मुद्देमाल लुटला. या व्यापाऱ्यांचे मे. शंकर ट्रेडींग कंपनी नावाचे उमर चौक येथे दुकान आहे. हे व्यापारी एकमेकांचे भाऊ असून आपले दुकान बंद करून घरी जात असताना ही घटना घडली. अविनाश शंकर संगनवार आणि अनिल शंकर संगनवार अशी लूटमार झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

merchant
undefined

नेहमी प्रमाणे रात्रीच्यावेळी दुकान बंद करून हे दोन भाऊ आपल्या दुचाकीने सिरंजनी गावाकडे जात होते. यावेळी काही अंतरावर त्यांच्या दुचाकी समोर अचानक एक कुत्रा आला. त्यामुळे त्यांनी आपली गाडी थांबवली. याच दरम्यान, त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले ४ दरोडेखोरे तेथे आले आणि त्यांनी दोघा भावांना लोखंडी रॉड, लाकडी ओढक्याने मारहाण केली. मारहाणीनंतर दरोडेखोरांनी त्यांच्या पिशवीतील ९० हजारांची रोकड लंपास केली आणि तेथून ते पसार झाले.

या मारहाणीत अविनाशच्या डोक्याला गंभीर मार लागून १७ टाके पडेल आहेत. तर अनिलच्या हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या अविनाशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनिलवर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. या दरोड्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Intro:हिमायतनगर तालुक्यात वाटमारी
व्यापारी वर्गात भितीचे वातावरण

नांदेड : हिमायतनगर सिरंजनी येथील व्यापारी अविनाश शंकर संगनवार व अनिल शंकर संगनवार यांचे मे. शंकर ट्रेडींग कंपनी नावाचे उमर चौक येथे दुकान असून दिवसभराचा व्यापार करून रात्रीला गावाकडे जात असताना सिरंजनी रोडवर रात्री 9.32 वाजता अज्ञात दरोडेखोरांनी मोटार सायकल अडवून प्राणघातक हल्ला करुन दि. 31 जानेवारीला नव्वद हजार रुपये लुट केल्याची रुग्णालयात रोफर केल्याचे यावेळी डॉ. भुरके डॉ. डॉ. सुनिल वसमतकर यांनी सांगितलेBody:उमर चौकातील दुकान रात्री ला बंद करुन नित्यनियमाने दोघेभाऊ सिरंजनी गावाकडे जात होते. सदरील अज्ञात दरोडेखोरांनी या दोघावर पाळत ठेवून काही अंतरवर मोटार सायकल गेल्यानंतर अचानक कुत्रा समोर आल्याने गाडी थांबवताय रस्त्याच्या बाजुला दबा धरुन बसलेले चार दरोडे खोरांनी दोघा भावावर लोखंडी रॉड, लाकडी ओढक्याने अविनाशच्या डोक्यावर हातापायावर आणि अनिलच्या हातापायावर गंभीर जखमा केल्या तेंव्हा अविनाश संगणवारे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून 17 टाके पडले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात नांदेडकडे रेफर केले आहेत. तर अनिलवर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालु आहेत.Conclusion:त्यांच्याकडे असलेले पिशवीतील नव्वद हजार रुपयांची रोकड घेवून दरोडेखोर पसार झाले आहेत. या दरोड्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने अद्याप दरोडेखोरांचा शोध आणि आरोपीला अटक न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यशुन्य वृत्तीमुळे एका व्यापार्‍याचा जीव धोक्यात आला असल्याचे व्यापारी वर्गातून आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.