ETV Bharat / state

हत्येप्रकरणी महिलेस जन्मठेप, पैशांच्या कारणावरून झाली होती एकाची हत्या

पैशांच्या देवाण-घेवाणीवरून एका व्यक्तीस जिवे मारल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश दीपक घोळकिया यांनी महिलेला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

author img

By

Published : May 14, 2019, 12:22 PM IST

जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड

नांदेड - पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका व्यक्तीस जिवे मारल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश दीपक घोळकिया यांनी महिलेला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जनाबाई रमेश पवार (४५, रा. सारखणी, ता. किनवट) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे.

जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड

किनवट तालुक्यातील सारखणी येथे १८ मे, २०१६ रोजी रात्री पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून सुरेश खेकारे (५०) हे जनाबाई पवार यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. या वादातून सुरेश यांना जनाबाईने बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेदिवसी मृताचा मुलगा कुणाल हा १७ मे रोजी माहूर येथे गेला होता. त्याने आपले पिता सुरेश यांना फोन केला. पण, सुरेश यांनी फोन न घेतल्याने कुणाल घरी आला. घरी येवून आईला विचारणा केली असता सुरेश दुपारपासूनच घराबाहेर गेल्याचे कळाले. यानंतर १८ मे च्या रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी सुरेश हे जनाबाईच्या घरात मरण पावल्याची माहिती कुणाल आणि त्यांच्या कुटुंबियांना दिली.

या घटनेप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक आर. के. खरात यानी केला. या प्रकरणाच्या तपासात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात जनाबाई पवार हिने सुरेशचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या खून प्रकरणात जनाबाईला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारच्या वतीने अॅड. रणजित देशमुख यांनी बाजू मांडली तर आरोपीच्या वतीने अॅड. पी. एन. शिंदे यांनी काम पाहिले.या प्रकरणात पुराव्याअभावी गंगाबाई उत्तम चव्हाण, प्रफुल्ल उत्तम चव्हाण आणि दिनेश उत्तम चव्हाण या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Intro:नांदेड - पैश्याच्या देवाणघेवणीतून एकाची हत्या, हत्येप्रकरणी महिलेस जन्मठेप.

नांदेड : पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन एका व्यक्तीस जिवे मारल्याप्रकरणी महिलेला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक घोळकिया यांनी सुनावली.Body:
किनवट तालुक्यातील सारखणी येथे १८ मे २०१६ च्या रात्री पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरुन
सुरेशराव खेकारे (वय ५०) हे जनाबाई रमेश पवार (४५) यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. याच वादातून सुरेशराव यांना जनाबाई पवार हिने बेदम मारहाण केली होती.मयताचा मुलगा कुणाल हा १७ मे रोजी माहूर येथे गेला होता.त्याने आपले पिता सुरेश यांना फोन केला.
त्यावेळी फोन न घेतल्याने कुणाल घरी आला. घरी येवून आईला विचारले असता सुरेशराव दुपारपासूनच
घराबाहेर गेले होते. याचवेळी कुणाल हा पित्याला शोधण्यासाठी जनाबाईच्या घरासमोरुन जात
असताना घरातून आवाज आला. पण त्याबाबत कुणालने काही विचारणा केली नाही. १८ मे च्या रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी सुरेशराव हे
जनाबाईच्या घरात मरण पावल्याची माहिती कुणाल व त्याच्या कुटुंबियाला दिली.Conclusion:
या घटनेप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास पोलिस उपनिरीक्षक आर. के. खरात यानी केला होता.
या प्रकरणाच्या तपासात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात जनाबाई पवार हिने सुरेशरावचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
या खून प्रकरणात जनाबाईला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. दीपक घोळकिया यांनी
ठोठावली. सरकार पक्षाची बाजू अॅड. रणजित देशमुख यांनी मांडली तर अॅड. पी. एन. शिंदे यांनी आरोपीचा बचाव केला,
या प्रकरणात पुराव्याअभावी गंगाबाई उत्तम चव्हाण, प्रपुल्ल उत्तम चव्हाण आणि दिनेश उत्तम चव्हाण या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.