ETV Bharat / state

नांदेडच्या अर्धापुरात पुन्हा बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे सावट - Nanded farmers news

अर्धापूर तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार सुरूच असून कारवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या नजरेस दिसून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

leopard
leopard
author img

By

Published : Jan 22, 2021, 8:18 PM IST

Updated : Jan 22, 2021, 8:25 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक बिबट्या विहिरीत पडल्यानंतर त्यास वनविभागाने पकडून जंगलात सोडून दिले. पण त्याचाच दुसरा साथीदार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अजून एक बिबट्या शेतकऱ्यांच्या नजरेत येत असून त्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकऱ्यांत भीतीचे सावट आहे.

अर्धापूर तालुक्यात मुक्तसंचार

अर्धापूर तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार सुरूच असून कारवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या नजरेस दिसून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात काही दिवसांच्या अंतराने पुन्हा बिबट्याचा वावर असल्याच्या माहितीमुळे शेतकरी चिंतेत आहे.

वन विभागाची गस्त

याच परिसरातील काही दिवसांपूर्वी बिबट्याने एक जनावर फस्त केले. या परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. या परिसरात घडलेल्या घटनेने वनविभाग सतर्क झाला. या परिसरात वनविभागाने गस्त सुरू केली.

पांगरी शिवारात पकडला होता बिबट्या

गेल्या आठवड्यात अर्धापूर तालुक्यातील रोडगी शिवारातील अनिल कदम यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला जिवंत बाहेर काढण्याची घटना झाली होती.

खैरगाव शिवारात एका जनावर केले फस्त

या घटनेनंतर काही दिवसांतच खैरगाव शिवारात एक जनावर फस्त केले होते. त्यानंतर कारवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रामराव वाघमोडे हे शेतातून घरी येताना दिसला.

बिबट्या तीन फूट उंचीचा

तीन फूट उंचीचा हा बिबट्या असल्याचे त्यांनी सांगितले. अर्धापूर तालुक्यातील चोरंबा, निमगाव, चाभरा, सायलवाडी, देशमुखवाडी आदी भाग जंगल असून या भागात वनविभाग कर्मचारी कार्यरत आहे. या परिसरात वन विभागाने गस्त वाढविली आहे. तसेच शेतकरी आणि गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Last Updated : Jan 22, 2021, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.