ETV Bharat / state

Nanded News: डी मार्टमध्ये चॉकलेटमध्ये निघाल्या अळ्या; चॉकलेटच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह - किटकॅट चॉकलेट

नांदेडमध्ये एका ग्राहकाला चक्क नेस्टले कंपनीच्या किटकॅट चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. सुभाष भंडारे नावाच्या व्यक्तीने लातूर फाटा इथल्या डी मार्टमधून किराणा सामानाची खरेदी केली. त्यासोबतच त्यांनी मुलांसाठी काही चॉकलेट घेतले, हे चॉकलेट खाताना त्यांना त्यात अळ्या आढळून आल्या आहेत.

Nanded News
डी मार्टमध्ये चॉकलेटमध्ये निघाल्या अळ्या
author img

By

Published : Feb 17, 2023, 1:30 PM IST

डी मार्टमध्ये चॉकलेटमध्ये निघाल्या अळ्या

नांदेड : या प्रकरणी भंडारे यांच्या तक्रारीवरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी चॉकलेटचा साठा जप्त करत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या या चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चॉकलेटच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासंबंधी सुभाष भंडारे यांनी नांदेड येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे. यात प्रयोगशाळेतील अहवालानंतर कार्यवाही करावी. तसेच मॉलच्या खाद्यपदार्थाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. चॉकलेट खाण्याविषयी शंका निर्माण होत आहेत.

Nanded News
डी मार्टमध्ये चॉकलेटमध्ये निघाल्या अळ्या

चौकशीची मागणी : यासंबंधी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2023 रोजी डी मार्ट व सरणी लातूर फाटा येथील मॉलमध्ये नेस्ले कंपनीचे किटकॅट चॉकलेट खरेदी केले. ते खाण्यासाठी फोडले असता, त्यामध्ये चॉकलेटच्या रंगाची जिवंत अळी आढळून आली आहे. ही बाब माॅल प्रशासनास तात्काळ कळवली. लेखी तक्रारीने किटकॅटच्या सर्व बॅचची प्रयोगशाळेतून चौकशी करावी. लहान मुलाच्या जीवनाशी खेळणाऱ्या कंपनीवर तात्काळ कार्यवाही करावी. या कंपनीच्या सर्व बॅचची चौकशी करावी, तसेच डी मार्टमधील सर्व हवाबंद खाद्यपदार्थांची चौकशी केली जावी. जेणेकरून लहान मुलाच्या जीवनाशी धोका निर्माण होणार नाही, असे सुभाष दिगंबर भंडारे यांनी म्हटले आहे.

काळजी घेणे आवश्यक : नेस्ले कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळी आढळल्यामुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. चॉकलेट हा लहान मुलांचा आवडतीचा विषय आहे. चॉकलेटसाठी मुले वाटेल ते करायला तयार होतात. त्यामुळे पालकांनी यापुढे चॉकलेट देताना खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. चॉकलेट घेतल्यानंतर स्वतः त्याची तपासणी करूनच मुलांना खाण्यास द्यावे. तसेच असा अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. यामुळे ग्राहकांमध्ये जागृती निर्माण होईल.त्यांचे आरोग्य व फसवणूक टाळली जाईल. असे तज्ञांमधून सांगितले जाते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी चॉकलेटचा साठा जप्त करत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या या चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चॉकलेटच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा : Food Poisoning News: शिर्डीत सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; शंभर मुले रूग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.