ETV Bharat / state

केरूर खून प्रकरण: गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा - Kerur murder case

मुखेड तालुक्यातील केरूर येथे पत्नीचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि 5 हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश अतुल सलगर यांनी ही शिक्षा सुनावली.

Kerur murder case: Penalty sentenced to life imprisonment
केरूर खून प्रकरण: गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा
author img

By

Published : Dec 14, 2019, 5:07 PM IST

नांदेड - मुखेड तालुक्यातील केरूर येथे पत्नीचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि 5 हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश अतुल सलगर यांनी ही शिक्षा सुनावली.

मुखेड तालुक्यातील केरूर येथील घटना -

आरोपी पाशामिया गफूर शेख याने 11 जानेवारी 2016 मध्ये आपल्या पत्नीचा खून केला होता. गुन्हेगाराने पत्नी रोशनबी पाशामियाला आपल्या घरातील तूर का विकू दिली नाही? या कारणावरून पत्नीवर चाकूने वार केला होता. यात तीच मृत्यू झाला होता. यानंतर मुखेड पोलिसांनी स्वत: आरोपीवर गुन्हा दाखला केला होता.

हेही वाचा - जालना : महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल

पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांनी या प्रकरणात वेळोवेळी मार्गदर्शन केले. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पाशामिय शेख याच्याविरूद्ध सहायक पोलीस निरीक्षक के. एन. चव्हाण यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील अ‌ॅड. महेश कागणे यांनी एकूण 15 साक्षीदारांच्या साक्ष न्यायाधीशांपुढे मांडल्या. या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पाशामियाचा मुलगा सैलानी शेख हा होता. मुखेडचे सत्र न्यायाधीश अतुल सलगर यांनी सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेप आणि 5 हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. आरोपीची औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा - जालन्यात सापडले 7 वे पिस्तूल; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

Intro:नांदेड (प्रतिनिधी):मुखेड तालुक्यातील केरुर येथे पत्नीचा खून केल्या प्रकरणी मुखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. खेडचे अतिरिक्त जिल्हा व  सत्र न्यायाधीश अतुल सलगर यांनी ही शिक्षा सुनावली.Body:पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप व पाच हजाराचा दंड...
मुखेड तालुक्यातील केरुर येथील घटना..

नांदेड (प्रतिनिधी):मुखेड तालुक्यातील केरुर येथे पत्नीचा खून केल्या प्रकरणी मुखेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. खेडचे अतिरिक्त जिल्हा व  सत्र न्यायाधीश अतुल सलगर यांनी ही शिक्षा सुनावली.
आरोपी  पाशामियाॅ गफुर शेख याने ११जानेवारी 2016 मध्ये आपल्या पत्नीचा खून केला होता. केरूर येथे दि ११ जानेवारी २०१६  रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पत्नी रोशनबी पाशामियॉ या विवाहितेला तिचा पती पाशामियाॅ गफुर शेख यांनी आपल्या घरातील तूर का विकू दिली नाही, या रागातून तिच्या अंगावर सुरीने अनेक वार केल्याने तिचा मृत्यु झाला होता. या मुळे मुखेड पोलिसांनी स्वत: या संदर्भाची तक्रार दिल्यानंतर मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ५/२०१६  कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.  
          या गुन्ह्यात पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असता या गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर पाशामियॉ शेख याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र तत्कालिन सहाय्यक पोलिस निरिक्षक के.एन.चव्हाण यांनी दाखल केले होते.
    या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील अॅड.महेश कागणे यांनी एकूण १५  साक्षीदारांच्या जबानी न्यायालयासमक्ष मांडल्या. या घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार  पाशामियाॅचा  मुलगा  सैलानी शेख हा होता. मुखेडचे  सत्र न्यायाधीश अतुल सलगर यांनी सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानुन पत्नीच खून केला प्रकरणी  पाशामियॉ शेख यास जन्मठेप आणि ५  हजार रूपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली.
      रक्कम नाही भरल्यास सहा महिने वाढिव शिक्षा देण्याची शिक्षा सुनावली. सरकारी वकील अॅड. महेश कागणे यांना या प्रकरणी मुखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर व सहायक पोलिस उपनिरीक्षक  डी.के. कांबळे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली. तर आरोपला  औरंगाबाद येथील मध्यवर्ती  कारागृहात रवानगी करण्यात आली.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.