नांदेड : राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील धान्य घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेले मेगा इंडिया ॲग्रो अनाज कंपनीचे (Complain against India Mega Anaj Company) संचालक अजयकुमार बाहेती यांना ईडीतून जामीन मिळाला (farmers of nagour district filed complaint) आहे. परंतु अद्याप मेगा इंडियाला धान्य पुरवठा करणाऱ्या तब्बल ९०० शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून अडकले आहेत. निसर्गाने झोडपले अन् मेगाने बुडविले, अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे.
ईडीची एन्ट्री : तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने शासकीय धान्याचा होणारा काळाबाजार उघडकीस आणला होता. शासकीय धान्य गोदामातून धान्याचे ट्रक थेट कृष्णूर येथील मेगा ॲग्रो अनाज कंपनीत जात होते. त्यावेळी पोलिसांनी मेगा ॲग्रोवर धाड टाकून शासकीय धान्याचे दहा ट्रक पकडले होते. या सर्व कारवाईचे व्हिडिओ चित्रण करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणात धान्य वाहतूक ठेकेदार, गोदामावरील कर्मचारी, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे कंपनीला टाळे लागले. मध्यंतरी ईडीचीही या प्रकरणात एन्ट्री झाली (India Mega Anaj Company cheated farmers ) होती.
कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलने : ईडीने अजयकुमार बाहेती यांना अटक केली होती. आता काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत. परंतु मेगा इंडिया कंपनीला धान्य पुरवठा करणारे शेतकरी यामध्ये फसले आहेत. धर्माबाद, मुदखेड, मुखेड आणि लोहा तालुक्यातील जवळपास ९०० शेतकऱ्यांनी या कंपनीला सोयाबीन, हळद आणि हरभरा हे धान्य पुरविले होते. त्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. या पैशांसाठी शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलने केली. तत्कालीन मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदने दिली. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. दिवाळीपूर्वी हे पैसे मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु त्यावरही पाणी फेरले (India Mega Anaj Company) आहे.
शेतकऱ्यांना आश्वासन : मेगा इंडिया अनाज कंपनीचे संचालक अजयकुमार बाहेती यांनी ३ जून २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या नावे एक प्रसिध्दी पत्रक काढले होते. त्यामध्ये कोरोना महामारीमुळे कंपनी संकटात आहे. विकलेल्या मालाचे पेमेंट मिळाले नाही, कंपनीत स्टॉक पडून आहे. त्यामुळे पैसे देण्यास उशीर झाला. परंतू आता एक ते दोन महिन्यात सर्व शेतकयांच्या पैसे देणार असे आश्वासन दिले (farmers of nagour district) होते.
चार तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश : धर्माबाद, मुदखेड, मुखेड आणि लोहा तालुक्यातील जवळपास ९०० शेतकयांनी या कंपनीला सोयाबीन, हळद आणि हरभरा हे धान्य पुरविले होते. त्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. त्यामुळे ही रक्कम केव्हा परत मिळते. याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. मेगा ॲग्रो अनाज कंपनीकडून आपल्या मालाचे पैसे मिळाल्यानंतर घरातील मुलीचे लग्न करण्याचे नियोजन काही जणांनी केले होते, तर अनेकांनी बांधकामही सुरु केले होते. परंतु हे पैसे अडकल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. पैसे न मिळाल्याने दोघांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.
शेतकऱ्यांचे पैसे द्या हो : मोठ्या विश्वासाने शेकडो शेतकऱ्यांनी मेगा ॲग्रो कंपनीला आपल्या कष्टाचे पीक दिले होते. परंतु गेल्या दोन वर्षाच्या काळात जवळपास ९०० शेतकऱ्यांचे २०० कोटी रुपये अडकले आहेत. अनेक वेळा आंदोलने केली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रवर्तन संचनालय दिल्लीला सुद्धा आम्ही या प्रकरणाची तक्रार केली आहे. त्यांना आम्ही पेनड्राईव्ह पुरावे सादर केले आहे, असे कदम यांनी (farmers of nagour district filed complaint) सांगितले.