नांदेड - धर्माबाद शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक, व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारिणीमधील विश्वस्त संचालक असलेले सुबोध काकानी यांच्या घरासह त्यांच्या विविध कार्यालय व संस्थेवर शुक्रवारी केंद्रीय आयकर विभागाच्या धाडी पडल्या असून या घटनेमुळे धर्माबाद शहर हादरले आहे.
दिल्लीवरून 30 ते 40 कर्मचारी धर्माबादेत दाखल -
या धाडीचा मुख्य उद्देश नेमका काय, याबाबत शहरात सर्वत्र उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या केंद्रीय आयकर विभागाच्या जवळपास ३७ चे ४० कर्मचाऱ्यांचे पथक हे दिल्लीवरून थेट हैदराबादला विमानाने उतरले व खासगी कार करून ते पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास धर्माबादला पोहोचले. अतिशय सुनियोजित पद्धतीने एकाच वेळी त्यांनी सुबोध काकांनी यांच्या घरी, बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा धर्माबाद तसेच त्यांचे वेअर हाऊस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, शाळा व त्यांच्या खासगी कार्यालयांमध्ये धाड टाकण्यात आली असून पथकाची विविध ठिकाणी कार्यवाही सुरु होती. ती रात्री उशिरापर्यंत किंवा उद्यापर्यंत (शनिवारी) कारवाई चालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धर्माबादमधील उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घरासह विविध संस्थावर आयकर विभागाचा छापा - धर्माबादमधील उद्योजक सुबोध काकाणी यांच्या संस्थांवर आयकरचा छापा
धर्माबाद शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक, व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारिणीमधील विश्वस्त संचालक असलेले सुबोध काकानी यांच्या घरासह त्यांच्या विविध कार्यालय व संस्थेवर शुक्रवारी केंद्रीय आयकर विभागाच्या धाडी पडल्या.