ETV Bharat / state

Chiku Farming: सत्तरीनंतरही आजोबांनी माळरानावर फुलवली चिकूची बाग,अडीच एकर क्षेत्रावर १०० चिकूच्या रोपांची लागवड

author img

By

Published : Feb 16, 2023, 2:24 PM IST

मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत. मात्र नांदेड शहरा लगत असलेल्या तुप्पा गावात एका वृद्ध जोडप्याने अपार मेहनत घेऊन माळरानावर चिकूची बाग फुलवली आहे. 71 वर्षीय शंकरराव पाकलवाड या शेतकऱ्याने सेवानिवृत्तीनंतर अडीच एकर जमिनीत चिकूचे शंभर रोपांची लागवड केली.

Chiku Farming
माळरानावर फुलवली चिकूची बाग
सत्तरीनंतरही आजोबांनी फुलवली चिकूची बाग

नांदेड: माळरानावर तेही अत्यल्प पाणी उपलब्ध असताना जोडप्याने मेहनत घेऊन ही चिकूची बाग फुलवली आहे. त्यासोबतच शेतात घरात लागणारे अन्य भाजीपालाही ते पिकवतात. लागवडीनंतर चौथ्या वर्षांपासून चिकुचे उत्पादन होण्यास सुरुवात झाली. उत्पन्नातून जोडप्यांचा खर्च भागत असल्याचे अभिमानाने या शेतकऱ्यांनी सांगितले. एकीकडे नापिकी आली म्हणून कोवळ्या वयात आत्महत्या करणारे शेतकरी पाहिले की, अश्या वृद्ध शेतकऱ्यांना पाहून आश्चर्यचकित व्हायची वेळ येते.

कंपनी सोडून केली शेती: अल्पभूधारक शेतकरी शंकरराव काशीराम पाकलवाड हे तुप्पा येथील रहिवासी आहेत. त्यांची जवाहरनगर परिसरात तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. लग्नानंतर त्यांनी सिडको येथील टेस्कॉम कंपनीत तीस वर्षे नोकरी केली व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आज त्यांची दोन्ही मुले जिल्हा परिषद शाळांत शिक्षक आहेत. मुलींचे सुशिक्षित घराण्यातील मुलांसोबत लग्न झाले आहे. मुले नोकरीला लागल्यानंतर त्यांनी कंपनी सोडली व गावाकडे राहू लागले. तीन एकर कोरडवाहू शेतीतून उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे त्यांनी बागायती शेती करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी आपल्या शेतात पाच बोअरवेल घेतले. त्यापैकी फक्त एका बोअरवेलला दोन इंची पाणी लागले. एवढ्या कमी पाण्यावर शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी चिकूची लागवड करण्याचे ठरविले.

वर्षाला ८ ते १० हजार खर्च: चिकू हे बारमाही फळ आहे. सन १९९० मध्ये अडीच एकर क्षेत्रावर १०० चिकूच्या रोपांची लागवड केली होती. त्या झाडांना ते एक इंची पाइप टाकून पाणी देतात. बोअलवेलवरील मोटार चार तास बंद ठेवल्यानंतर केवळ दीड ते दोन तास पाणी येते. कमी पाण्यावर आजतागायत बाग जिवंत ठेवली आहे. लागवडीनंतर चार वर्षांनी त्या बागेतून चिकूचे उत्पन्न मिळण्यास सुरु झाले. तेव्हापासून ते केवळ या पिकावर आपल्या पत्नीसह स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. मुले नोकरीला असली तरी पैसे मागण्याची गरज नाही. या बागेला सध्या वर्षाला ८ ते १० हजार एवढा कमी खर्च लागतो. त्यामुळे आज आम्हा पती-पत्नीला तीन एकर जमिनीचे उत्पन्नच संपत नाही. मुले नोकरीला असली तरी, आम्हाला त्यांच्या पैशाची अपेक्षा नाही, असे शेतकरी शंकरराव काशीराम पाकलवाड मोठ्या अभिमानाने सांगतात.

हेही वाचा: Education भोकर परिसरात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचे धडे शाळाबाहा मुलांना साक्षर करण्यासाठी तरुणाची धडपड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.