नांदेड - अवैध रेती उत्खननाला आळा बसावा यासाठी आता आम्ही अधिक कठोर पावले उचलत असून नांदेड महानगर पालिका, जिल्ह्यातील नगर परिषदा व ग्राम पंचायतीच्या हद्दीत जिथे कुठे मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा उपलब्ध असेल तो जिल्हा प्रशासनातर्फे जागच्या जागीच जप्त करून जाच्या मालकीची ती जागा आहे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.
हेही वाचा - कौतुकास्पद! नांदेडच्या सामान्य कुटुंबातील कन्येची आसाम रायफलमध्ये निवड..!
इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अवैध रेती उत्खननाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. रेतीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता ज्या नागरिकांनी बांधकामासाठी रेती घेवून ठेवलेली आहे, त्यांनी रेतीच्या पावत्या तपासणी पथकाला दाखवाव्यात. रेतीच्या पावत्या देणे हे कायद्याने बंधनकारक असून अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूलच्या पथकांना जनतेने सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार किरण अंबेकर उपस्थित होते. सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
हेही वाचा - रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी