नांदेड - मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठा शिष्यवर्ग असलेले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार असल्याची काल अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, महाराज जिवंत समाधी घेणार नाहीत, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते प्रा.मनोहर धोंडे यांनी दिली.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना काल नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. दरम्यान, शुक्रवारी महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. यामुळे अहमदपूरमध्ये हजारो भक्तांची गर्दी जमली होती. अफवा पसरवून षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्या भक्तांनी केली आहे. राष्ट्रसंत म्हणून परिचित असलेले अहमदपूरकर महाराज हे आता 104 वर्षाचे असून त्यांचे देशभरात लाखो भक्त आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांच्या भक्तांनी केली आहे.
हेही वाचा - वीज बिल माफीच्या प्रस्तावावर वित्त विभागात अंधार