नांदेड- येथील गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डातर्फे ऐतिहासिक गुरुद्वारा चौकी यात्रेस आजपासून प्रारंभ होत आहे. यावेळी गुरुद्वारा मालटेकडीसाठी पहिली धार्मिक चौकी यात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक गुरूविंदरसिंग वाधवा यांनी केले आहे.
हेही वाचा- थेट सरपंच निवड रद्द; आता सदस्यच निवडणार सरपंच
दुसरी यात्रा २ फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा संगतसाहेब चौफाळा येथून निघणार आहे. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा हिराघाट, ९ फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा माता साहेब आणि गुरुद्वारा शिकारघाट येथून एकाच दिवशी यात्रा काढण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा दमदमा साहिब बसमत नगर येथे यात्रा पोहोचणार आहे.
त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा रतनगड साहेब येथे यात्रा काढण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी नानकसर साहेब, नानक पुरी आणि विष्णुपुरी येथे गुरुद्वारा चौकी यात्रा साजरी होणार आहे. विष्णुपुरी येथून ही यात्रा सायंकाळी गुरुद्वारा बंदाघाट साहीब येथे पोहचणार आहे. येथून रात्री उशिरा चौकी यात्रा परत गुरुद्वारा तखत सचखंड हजूर साहिब येथे परतणार आहे. सर्व गुरुद्वारामध्ये चौकीचे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर नंतर लंगर प्रसाद कार्यक्रम होणार आहे. यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक गुरूविंदरसिंग वाधवा यांनी केले आहे.
.