ETV Bharat / state

नांदेड: ग्रामपंचायत निवडणुकीत ८६ टक्के मतदान; उमेदवारांची घालमेल वाढली - Voting percentage Nanded

ग्रामीण भागाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल विक्रमी ८६ टक्के मतदान झाले. यामुळे गावपातळीवरील नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. पॅनल प्रमुख व उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. ही धडधड मतमोजणी झाल्यावरच थांबणार आहे. पॅनलच्या विजयाबद्दल पैजा लागत आहेत.

Voting percentage Nanded
वाढत्या टक्केवारीने उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली
author img

By

Published : Jan 16, 2021, 7:38 PM IST

नांदेड - ग्रामीण भागाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल विक्रमी ८६ टक्के मतदान झाले. यामुळे गावपातळीवरील नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. पॅनल प्रमुख व उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. ही धडधड मतमोजणी झाल्यावरच थांबणार आहे. पॅनलच्या विजयाबद्दल पैजा लागत आहेत.

हेही वाचा - नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जानापुरीत तुफान हाणामारी

जिल्ह्यातील 1 हजार 13 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया...

जिल्ह्यातील 1 हजार 13 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया चालू असून, 103 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली. उरलेल्या 903 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान घेण्यात आले. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. जिल्ह्याला 3 हजार कंट्रोल युनिट व 3 हजार 617 बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत.

गावातील समीकरणावरून निवडणुका..

या निवडणुकीत पक्षांच्या चिन्हांचा वापर नसल्यामुळे स्थानिक राजकीय समिकरणे, गटानुसार पॅनल झाले. काही अपवाद वगळता प्रत्येक पॅनमेलमध्ये सर्वच पक्षाचे स्थानिक नेते एकत्र लढले आहेत. काही गावात शिवसेना, काँग्रेस, भाजप असे पॅनल होते, तर कुठे भाजप सेना, तर कुठे भाजपा काँग्रेस, असे वेगवेगळ्या विचाराचे स्थानिक नेते एकत्र येऊन निवडणूक लढले.

काँग्रेसचेही स्वतंत्र पॅनल...

काही गावांमध्ये पक्षाच्या नावावर पॅनल केले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दोन स्वतंत्र पॅनल करून निवडणूक लढवली. हे दोन्ही गट पालकमंत्री अशोक चव्हाण यांना माननारे आहेत.

कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी....

मतदारांना लक्ष्मी दर्शन केल्याची जोरदार चर्चा गावागावात रंगली आहे. तालुक्यात निवडणुकीच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाल्याचे समजले असून आता निकालाची प्रतिक्षा आहे. यंदा विक्रमी मतदान झाल्याने गावपातळीवर नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत कोणाला मतदानाचे तिळगूळ दिले व कोणावर संक्रांत आली हे मतमोजणी झाल्यावर स्पष्ट होईल. तो पर्यंत काय होईल, कसे होईल, असेच म्हणत बसावे लागणार आहे.

जिल्ह्यात 86 टक्के मतदान...

हिमायतनगर तालुक्यात 75 टक्के, तर मुदखेड तालुक्यात सर्वाधिक 85 टक्के एवढे मतदान पार पडले.

तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे -

नांदेड- 78.05 टक्के, अर्धापूर- 83 टक्के, भोकर- 83.57 टक्के, मुदखेड- 85 टक्के, हदगाव- 79 टक्के, हिमायतनगर- 75 टक्के, माहूर- 81.35 टक्के, धर्माबाद- 83 टक्के, उमरी- 84.21 टक्के, बिलोली- 82.46 टक्के, नायगाव- 87 टक्के, देगलूर- 84 टक्के, मुखेड- 80 टक्के, लोहा- 80 टक्के, कंधार- 81.37 टक्के एवढे मतदान झाले आहे. किनवट - 86

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी: काका-पुतण्या तर सासू-सुनांचा एकमेकांविरोधात शड्डू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.