नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे हातावर पोट असलेल्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुखेड शाखेच्या वतीने गरजवंतांना धान्याचे किट वाटप करण्यात आले. शहरातील गरजू व्यक्तींची नावे काढून त्यांना घरोघरी धान्य वाटप करण्यात येत आहे. तसेच विविध उपक्रमांद्वारे जनजागृतीही करण्यात आलीय. नागरिकांना बाहेर न पडता घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुखेडचे शाखाधिकारी सुनिलकुमार मदीराजु, प्रमित गजभिये, मंगेश सोनटक्के, रौनक तिवारी यांच्यासह नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, कृष्णा देबडवार, नागेश कालानी, ज्ञानेश्वर डोईजड, महेश मुक्कावार, योगेश पाळेकर आदी उपस्थित होते.