ETV Bharat / state

नांदेड : 'त्या' सराफा व्यापाऱ्याची हत्या पूर्ववैमनस्यातून?...

author img

By

Published : Oct 27, 2019, 12:12 PM IST

शहरातील गुरूकृपा ज्वेलर्समध्ये अज्ञात दरोडेखोरांनी शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुकानात शिरून रवींद्र चक्रवार यांना कैचीने भोसकून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून ही हत्या ही जुन्या वादाच्या कारणाने करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सराफा व्यापाऱ्याची हत्या

नांदेड - येथील सराफा बाजारातील दुकानात अज्ञात दरोडेखोरांनी घुसून रवींद्र चक्रावार या व्यापाऱ्याची हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून सदर हत्या ही जुन्या वादाच्या कारणावरून करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, भर पावसात झालेल्या या हत्याकांडाचा माग काढण्यात श्वानपथकाला अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे.

सराफा व्यापाऱ्याची हत्या

शहरातील गुरूकृपा ज्वेलर्समध्ये अज्ञात दरोडेखोरांनी शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुकानात शिरून रवींद्र चक्रवार यांना कैचीने भोसकून त्यांची हत्या केली होती. या हत्येनंतर दरोडेखोरांनी दुकानातील काही दागिने लुटून नेल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात दुकानातील ३ लाखाची रोकड, पाव किलो सोने आणि किलोभर चांदी दुकानातच आढळून आली आहे. त्यामुळे ही हत्या नेमकी कशासाठी झाली याचा पोलिसांना उलगडा झाला नाही. मात्र, मारेकरी या दुकानातील सीसीटीव्हीच्या साहित्याचे नुकसान करून गेले आहेत. शिवाय घटना घडली त्यावेळी जोरदार पाऊस होता, त्यामुळे श्वान पथकाचा उपयोग होऊ शकला नाही.

हेही वाचा - नांदेडमध्ये दरोडेखोरांनी कैचीने भोकसून ज्वेलर्स व्यापाऱ्याचा केला खून, दागिने घेऊन पसार

ही हत्या जुन्या वादाच्या कारणावरून करण्यात आल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. तसेच आर्थिक देवाण घेवाणचे काही वाद आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. शिवाय मृतक चक्रवार यांचे उमरी येथे काही जुने संपत्तीचे वाद असून त्यात गुन्हेही दाखल असल्याचे समजते. या सगळ्या घडामोडींमुळे जवळच्याच कुणीतरी पाळत ठेऊन चक्रवार यांची नियोजन पद्धतीने हत्या केल्याचा संशय व्यक्त होत असून सध्या पोलिसांचा त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

हेही वाचा - नव्या मंत्रिमंडळात रातोळीकरांना संधी द्या, प्रवीण गायकवाड यांची मागणी

Intro:नांदेड : सराफा व्यापाऱ्याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज.

नांदेड : सराफा बाजारातील व्यापारी रवींद्र चक्रवार यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी काही संशयित ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र भर पावसात झालेल्या या हत्याकांडाचा माग काढण्यात श्वानपथकाला अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे.Body:
सराफा बाजारातील व्यापारी रवींद्र चक्रवार यांची दुकानात शिरून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर दुकानातील काही दागिने लुटून नेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात दुकानातील तीन लाखाची रोकड, पाव किलो सोने आणि किलोभर चांदी दुकानातच आढळून आलीय. त्यामुळे ही हत्या नेमकी कश्यासाठी झाली याचा पोलिसांना उलगडा झाला नाही. मारेकरी या दुकानातील सीसीटीव्हीच्या साहित्याचे नुकसान करून गेले आहेत, शिवाय घटना घडली त्यावेळी जोरदार पाऊस होता, त्यामुळे श्वान पथकाचा उपयोग होऊ शकत नाही.Conclusion:
जुन्या वादाच्या कारणावरून सराफा व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आर्थीक देवाण घेवाणचे काही वाद आहेत का याचा पोलीस शोध घेतायत. शिवाय मयत चक्रवार यांचे उमरी इथे काही जुने संपत्तीचे वाद असून त्यात गुन्हे ही दाखल असल्याचे समजते. या सगळ्या घडामोडीमुळे जवळच्याच कुणीतरी पाळत ठेऊन चक्रवार यांची नियोजन पद्धतीने हत्या केल्याचा संशय व्यक्त होतोय, त्या दृष्टीने सध्या पोलीस तपास सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.