ETV Bharat / state

कोणाशीही निष्ठा न बाळगणारा उमेदवार निष्ठावंत कसा; किन्हाळकरांचा भाजपला खडा सवाल

कोणाशीही निष्ठा न राखणारा उमेदवार आपल्या मतदारसंघाशी निष्ठावंत कसा राहणार असा प्रश्न भाजपचे नेते सुभाष किन्हाळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच मतदारांनी भूलथापांना बळी न पडता अशोक चव्हाण यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कोणाशीही निष्ठा न राखणारा उमेदवार आपल्या मतदारसंघाशी निष्ठावंत कसा राहणार असा प्रश्न भाजपचे नेते सुभाष किन्हाळकर यांनी उपस्थित केला आहे.
author img

By

Published : Oct 12, 2019, 8:47 AM IST

नांदेड - कोणाशीही निष्ठा न राखणारा उमेदवार आपल्या मतदारसंघाशी निष्ठावंत कसा राहणार असा प्रश्न भाजपचे नेते सुभाष किन्हाळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच मतदारांनी भूलथापांना बळी न पडता अशोक चव्हाण यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भोकर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील म्हैसूर-तांडा येथे प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी सुभाष किन्हाळकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर सडकून टीका केली.

भाजपचे नेते व माजी मंत्री माधवराव किन्हाळकर हे भोकर मतदारसंघातून उमेदवारी साठी इच्छुक होते. परंतु, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अशोक चव्हाण यांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे.

राज्यातील युती सरकारने तांड्याला निधी देणे बंद केल्याने मतदारसंघाची दुर्दशा झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच काँग्रेसच्या काळात विकास कार्यक्रम राबवून तांड्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख त्यांनी केला. राज्यात भोकर तालुका विकासाच्या बाबतीत एक नंबरवर आणू, असे आश्वासन चव्हाण यांनी आपल्या भाषणातून दिले. विकासकामांबद्दल बोलताना, तालुक्यात एकूण 64 पाणीपुरवठा योजना आणण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचा विश्वाव त्यांनी व्यक्त केला.

मला तुम्ही सालदार म्हणून ठेवा; पण चुकीचा माणूस पुन्हा यायला नको, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. लोकसभेच्या वेळी जी चूक झाली; ती या वेळी होऊ देऊ नका, असे म्हणाले. तुमच्या प्रेमाची परतफेड विकासाच्या कामातून करणार असल्याचे चव्हाण यांनी भाषणातून सांगितले.

यावेळी मारोती बल्लाळकर, सुभाष कोळगावकर, रामराव पाटील, आनंद माजरीकर, सुभाष पाटील कोळगावकर, सुभाष किन्हाळकर यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:कोणाशीही निष्ठा न बाळगणारा निष्ठावंत कसा?-सुभाष किन्हाळकर

नांदेड: कोणाशीही निष्ठा न राखणारा उमेदवार आपल्या मतदारसंघाशी निष्ठावंत कसा राहणार असा सवाल करून मतदारांनी भूलथापांना बळी न पडता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन सुभाष पाटील किन्हाळकर यांनी केले आहे .
Body:कोणाशीही निष्ठा न बाळगणारा निष्ठावंत कसा?-सुभाष किन्हाळकर

नांदेड: कोणाशीही निष्ठा न राखणारा उमेदवार आपल्या मतदारसंघाशी निष्ठावंत कसा राहणार असा सवाल करून मतदारांनी भूलथापांना बळी न पडता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन सुभाष पाटील किन्हाळकर यांनी केले आहे .

भोकर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी आज भोकर तालुक्यातील म्हैसूर तांडा येथे प्रचारसभा झाली. त्या प्रसंगी सुभाष पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर सडकून टीका केली.
भाजपचे नेते माजी मंत्री माधवराव किन्हाळकर हे भोकर मतदारसंघातून उमेदवारी साठी इच्छूक होते.पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांचे बंधू सुभाष पाटील किन्हाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अशोक चव्हाण यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यातील भारतीय जनता पार्टी - शिवसेनेच्या - सरकारने तांड्यांना निधी देणे बंद केले आहे. त्यामुळे तांड्यांची दर्दशा झाली आहे . - काँग्रेसच्या काळात तांडाविकास कार्यक्रम राबवून तांड्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला . आतापर्यंत जी विकासाची - कामे झाली , त्यात रस्ते , पाणीपुरवठा योजना , सभागृह , वीज आदी काँग्रेसची देण आहे . आपण रामराव महाराजांचे तसेच प्रेमसिंघ यांचे आशीर्वाद घेऊनच भोकर विधानसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे . राज्यात भोकर तालुका विकासाच्या बाबतीत एक नंबरवर आणू असे आश्वासन चव्हाण यांनी आपल्या भाषणातून दिले . शासनाने दुर्लक्षित ठेवलेल्या वाडीतांड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न
आपण करणार आहोत . पुढची पाच वर्षे , महत्त्वाची आहेत . येथील विकासाच्या कामांना चालना मिळणार आहे . - स्व . वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या घराण्यांशी चव्हाण कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत , असेही ते म्हणाले . भोकर तालुक्यात एकूण ६४ पाणीपुरवठा योजना घेण्यात आल्या आहेत . त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे . मला तुम्ही सालदार म्हणून ठेवा , परंतु चुकीचा माणूस पुन्हा यायला नको . लोकसभेच्या वेळी जी चूक झाली ती या वेळी होऊ देऊ नका . तुमच्या प्रेमाची परतफेड विकासाच्या कामातून मी करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून सांगितले. या वेळी मारोती बल्लाळकर , सुभाष पाटील कोळगावकर आदींची भाषणे झाली. यावेळी रामराव पाटील , आनंदराव पाटील माजरीकर , सुभाष पाटील कोळगावकर , बालाजी पोकलवाड , दादासाहेब रावणगावकर , मारोती बल्लाळकर , रोहिदास जाधव , गंगाधर चव्हाण , सुभाष पाटील किन्हाळकर , उत्तमराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होतीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.