ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार; अनेक भागात नदी-नाल्यांना पूर - नांदेड नदी बातमी

नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे मुगाचे पीक वाया गेले असून सोयाबीनचे पीकही पिवळे पडत आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 17, 2020, 3:35 PM IST

नांदेड - जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सर्वदूर संततधार पाऊस होत आहे. या पावसामुळे हिमायतनगर, माहूर, किनवट, भोकर या तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नसून अधून-मधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. हातातोंडाशी आलेले मुगाचे पीक वाया गेले असून सोयाबीनचे पीकही पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.

जिल्ह्यातील पावसाची स्थीती

आज (17 ऑगस्ट) सकाळी आलेल्या अहवालानुसार मागील 24 तासात जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील इसलापूर येथे 83 मिलीमीटर तर हिमायतनगर येथे 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यासह जलधरा, बोधडी, शिवणी, देहली, मनाठा, मांडवा, मातुळ, माहूर या दहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर देगलूर, कंधार, लोहा, नांदेड, बिलोली, नायगाव, मुदखेड, मुखेड या आठ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामूळे जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही. रोजच पडणारा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेच नाही.

आठ ऑगस्टचा अपवाद वगळता सात दिवस सर्वदूर हलका, मध्यम स्वरुपाचा भिज पाऊस रोजच पडत आहे. सोमवारीही सकाळपासूनच रिमझिम, मधूनच हलक्या व मध्यम पावसाच्या सरी पडत होत्या. यावर्षी खरिपाची पेरणी होताच पिकांना पोषक पाऊस झाल्याने जिल्ह्यात कपाशी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद व इतर पिके चांगली बहरल्याचे दिसत आहे. आंतरमशागतीची कामे कामे देखील जोरात सुरू असल्याचे शेतशिवारांमधून दिसून येत आहे. सध्या मुगाचे पीक हाती आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मुगाला मोड फुटल्याचे चित्र आहे.

सततच्या पावसामुळे मशागतीच्या कामांना व्यत्यय येत असून पिकेदेखील पिवळी पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांतील पावसामूळे मात्र मराठवाडा व जिल्ह्यातील धरणासाठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली अनेक धरण ओव्हरफ्लो झाली आहेत.

आजची धरणांची स्थिती...!

विष्णूपूरी 100 टक्के

जायकवाडी 65 टक्के

इसापूर 60 टक्के

माजलगाव 67 टक्के

येलदरी 100 टक्के

सिद्धेश्वर 100 टक्के

लिंबोटी 70 टक्के

बारुळ 73 टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.