नांदेड - मालेगाव मार्गालगत असलेल्या सरपंच नगरातील खून प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली. पूर्वी अटक केलेली आरोपी पत्नी पोलीस कोठडीत आहे.
१ लाख रुपयांची दिली होती सुपारी
सरपंचनगर येथील रहिवासी शरद नारायण कुऱ्हाडे हा वाद घालून घर विक्री करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याची पत्नी अश्विनी कुऱ्हाडे व मुलाने एकाच्या मदतीने विशाल गव्हाणे यास १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर गव्हाणे व इतर चौघांनी शरद कुऱ्हाडे याची दीड वर्षापूर्वी १४ ऑगस्ट २०१९ रोजी हत्या दरम्यान वैद्यकीय अहवालात नमूद केले. तसेच पोलिस तपासातही सदर व्यक्तीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भाग्यनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवाज जमालसाब यांनी केली.
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी ७ जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये आरोपी पत्नीला यापूर्वी अटक केली असून ती सध्या १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी सांगितले.