ETV Bharat / state

नांदेड : घनकचरा ठेकेदाराकडून साडेपाच कोटीचा अपहार, आयुक्तांकडे तक्रार - अपहार

मुंबईच्या आर अॅण्ड बी कंपनीच्या घनकचरा व्यावस्थान ठेकेदाराने फेब्रुवारी, 2018 ते डिसेंबर, 2018 या कालावधीत कामगारांना ठरलेल्या वेतनापेक्षा कमी रक्कम देत अपहार केल्याची तक्रार युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी नांदेड महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. हा अपहार तब्बल साडेपाच कोटीचा असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

नांदेड महापालिका
नांदेड महापालिका
author img

By

Published : Feb 9, 2020, 8:46 AM IST

नांदेड - शहरातील कचरा उचलून वाहतूक करण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराकडून कामगारांच्या वेतनातील साडेपाच कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची तक्रार महापालिका कामगार कर्मचारी युनियनने आयुक्तांकडे केली आहे. दिनांक 21 फेब्रुवारी, 2018 ते 31 ऑक्टोबर, 2019 या 20 महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आणली. अपहाराची रक्कम वसूल करुन कामगारांच्या खात्यात जमा करावी व संबंधिताविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी केली आहे.

मुंबईच्या आर अॅण्ड बी कंपनीस दि. 21 फेब्रुवारी, 2018 पासून शहरातील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करुन त्याची वाहतूक करुन प्रकल्पस्थळावर टाकण्याचे काम देण्यात आले आहे. या कामासाठी घंटा गाड्यांवर सुमारे 350 कुशल व अर्धकुशल कामगार नेमण्याची जबाबदारी ठेकेदारावर असून मनपाच्या मागणीनुसार 400 कामगारांपर्यंत अतिरिक्त मजूर पुरवठा करण्याचे बंधन ठेकेदारावर आहे. वाहनावरील कामगारांच्या वेतनाची जबाबदारी ठेकेदारावर असून अतिरिक्त मजुरांच्या मासिक वेतनाची रक्कम तसेच प्रत्येक कामगारांपोटी प्रतिदिन 80 रुपये (दरमहा दोन हजार 400 रुपये) या प्रमाणे महापालिका सेवाकर अदा करत आहे, पण, दि. 21 फेब्रुवारी, 2018 ते 31 डिसेंबर, 2018 या कालावधीत महापालिकेने निश्चित केलेल्या किमान वेतनाप्रमाणे ठेकेदाराने सर्व कामगारांना प्रतिदिन 336 रुपये याप्रमाणे मासिक वेतन देणे आवश्यक होते. पालिकेस पुरवठा केलेल्या 400 कामगारांना याच दराने वेतन दिल्याची देयके ठेकेदाराने सादर केली. परंतु प्रत्यक्षात कामगारांना प्रतिदिन केवळ 200 रुपये प्रमाणे वेतन दिले गेले. प्रतिकामगार प्रतिदिन 136.46 रुपये याप्रमाणे 314 दिवसांच्या कालावधीत वेतनात 3.21 कोटी कमी देण्यात आल्याचे युनियनने तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा - ...आणि रेशन दुकानाच्या परवान्यासाठी बिलोली तालुक्यात झाले मतदान

1 जानेवारी ते 30 जून, 2019 दरम्यान महापालिकेने ठेकेदाराला प्रतिदिन प्रतिकामगार 403.60 रुपये याप्रमाणे वेतनाची रक्कम अदा केली. परंतु कामगारांना प्रत्यक्षात 266.50 रुपये प्रतिदिन याप्रमाणे दोन टप्प्यात वेतन मिळाले. त्यामुळे या 181 दिवसांच्या कालावधीत प्रतिकामगार प्रतिदिन 136.94 याप्रमाणे कामगारांच्या एकूण 185 कोटी रुपयांवर ठेकेदारान डल्ला मारला. दि. 1 जुलै ते 31 ऑक्टोबर, 2019 या दरम्यान महापालिकेने प्रतिकामगार प्रतिदिन दिलेल्या 420.66 रुपयांतील 336.66 याप्रमाणे रक्कम अदा करुन उर्वरीत 113 रुपये याप्रमाणे 61 दिवसांचे 52.12 लाख रुपये स्वत:कडे ठेवून घेतले. 20 महिन्याच्या कालावधीतील अशा पद्धतीने कमी दिलेली रक्कम 5 कोटी 59 लाख 38 हजार 926 रुपये होतो. ड्रेनेज, उद्यान, अतिक्रमण, स्टेडियम, आरोग्य (मलेरिया) या विभागाच्या कंत्राटी कामगारांना बँक खात्यामार्फत वेतन न देता रोखीने देऊन त्यांच्या रजिस्टरवर सह्या तसेच अंगठ्याचे ठसे घेतल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा -'केंद्र सरकारचे 'हम करे सो कायदा' हे धोरण देशात चालणार नाही'

घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणारे जवळपास सर्व मजुरांच्या अज्ञान व कमी शिक्षणाचा फायदा घेऊन त्यांची पिळवणूक व फसवणूक होत आहे. अपहारास जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारावर गुन्हा नोंदवावा. अपहाराची रक्कम वसूल करून संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणीही काँ. शिंगे यांनी या निवेदनात केली आहे.

हेही वाचा - बड्या अधिकाऱ्याच्या पुत्राला वाचवण्यासाठी उभा केला 'डमी'चालक, पोलीस ठाण्यात तणाव

Intro:महापालिकेच्या घनकचरा ठेकेदाराकडून साडेपाच कोटीचा अपहार; कर्मचारी युनियनची मनपा आयुक्तांकडे तक्रार
Body:महापालिकेच्या घनकचरा ठेकेदाराकडून साडेपाच कोटीचा अपहार; कर्मचारी युनियनची मनपा आयुक्तांकडे तक्रार

नांदेड: शहरातील कचरा उचलून वाहतूक करण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराकडून कामगारांच्या वेतनातील साडेपाच कोटी रुपयांच्या रक्कमेचा अपहार झाल्याची तक्रार मनपा कामगार कर्मचारी युनियनने आयुक्तांकडे केली आहे.

२१ फेब्रुवारी २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या २० महिन्याच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आणताना अपहाराची रक्कम वसूल करुन कामगारांच्या खात्यात जमा करावी व संबंधिता विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी युनियनचे संस्थापक अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी केली आहे.
मुंबईच्या आर अँन्ड बी कंपनीस दि. २१ फेब्रुवारी २०१८ पासून शहरातील घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करुन त्याची वाहतूक करुन प्रकल्पस्थळावर टाकण्याचे काम देण्यात आले आहे. या कामासाठी कच-याच्या वाहनावर सुमारे ३५० कुशल व कुशल कामगार नेमण्याची जबाबदारी ठेकेदारावर असून मनपाच्या मागणीनुसार ४०० कामगारांपर्यत अतिरिक्त मजूर पुरवठा करण्याचे बंधन ठेकेदारावर आहे. वाहनावरील कामगारांच्या वेतनाची जबाबदारी ठेकेदारावर असून अतिरिक्त मजुरांच्या मासिक
वेतनाची रक्कम तसेच प्रत्येक कामगारांपोटी प्रतिदिन ८० रुपये (दरमहा २४०० रुपये)
याप्रमाणे महापालिका सेवाकर अदा करीत आहे.
दि. २१ फेब्रुवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत मनपाने निश्चित केलेल्या किमान वेतनाप्रमाणे ठेकेदाराने सर्व कामगारांना प्रतिदिन ३३६ रुपये याप्रमाणे मासिक वेतन देणे आवश्यक होते. मनपास पुरवठा केलेल्या ४०० कामगारांना याच दराने वेतन
दिल्याची देयके ठेकेदाराने सादर केली. परंतु प्रत्यक्षात कामगारांना प्रतिदिन केवळ २०० रुपये याप्रमाणे वेतन हातावर ठेवल्या गेले. प्रतिकामगार प्रतिदिन १३६.४६ रुपये याप्रमाणे ३१४ दिवसांच्या कालावधीत वेतनातन ३.२१ कोटी कमी देण्यात आल्याचे युनियनने तक्रारीत नमूद केले आहे.

१ जानेवारी ते ३० जून २०१९ दरम्यान महापालिकेने ठेकेदाराला प्रतिदिन
प्रतिकामगार ४०३.६० रुपये यापमाणे वेतनाची रक्कम अदा केली. परंतु कामगारांना
प्रत्यक्षात २६६.६० रुपये प्रतिदिन याप्रमाणे दोन टप्प्यात वेतन मिळाले. त्यामुळे या १८१
दिवसाच्या कालावधीत प्रतिकामगार प्रतिदिन १३६.९४ याप्रमाणे कामगारांच्या हातात एकूण १८५ कोटी रुपये पडले नाहीत. दि. १ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०१९ दरम्यान महापालिकेने
प्रतिकामगार प्रतिदिन दिलेल्या ४२०.६६ रुपयांतील ३३६.६६ याप्रमाणे रक्कम अदा करुन उर्वरीत ११३ रुपये याप्रमाणे ६१ दिवसांचे ५२.१२ लाख रुपये स्वत:कडे ठेवून घेतले. २० महिन्याच्या कालावधीतील अशा पद्धतीने कमी दिलेली रक्कम ५ कोटी ५९ लाख ३८ हजार
९२६ रुपये होत असून ड्रेनेज, उद्यान, अतिक्रमण, स्टेडियम, आरोग्य (मलेरिया) या
विभागाच्या कंत्राटी कामगारांना बँक खात्यामार्फत वेतन न देता रोखीने देऊन त्यांच्या
रजिस्टरवर सह्या तसेच अंगठ्याचे ठसे घेतल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणारे जवळपास सर्व मजूर नवबौद्ध, महार, मातंग या अनुसूचित जातीतील असल्याने त्यांच्या अज्ञान व कमी शिक्षणाचा फायदा घेऊन त्यांची पिळवणूक व फसवणूक होत असल्याने या अपहारास जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांसह घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारावर गुन्हा नोंदवावा तसेच अपहाराची रक्कम वसूल करून संबंधित कामगारांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणीही काँ. शिंगे यांनी या निवेदनात केली आहे.

...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.