ETV Bharat / state

नायगावमधील कापूस जिनिंगला आग; कोट्यवधींचे नुकसान - आगीत कापूस जळून खाक

आजघडीला या जिनिंगमध्ये खरेदी झालेला व विक्रीस आलेला जवळपास वीस ते पंचवीस हजार क्विंटल कापूस होता. या सर्व कापसाला आग लागली आहे. लोकांना काही समजण्यापूर्वीच आगीने उग्ररुप धारण केले. आगीची माहिती मिळताच नायगाव नगरपंचायतीची अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली.

fire broke out in cotton ginning in naygaon
नायगावमधील कापूस जिनिंगला आग
author img

By

Published : May 29, 2020, 8:34 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील नायगाव येथील शेळगाव रोडवर असलेल्या भारत जिनिंगला गुरुवार रात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. नायगाव येथील भारत जिनिंग ही डी.बी.पाटील होटाळकर यांच्या मालकीची आहे. या जिनिंगमध्ये मुखेड, देगलूर, कंधारसह नायगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचा कापसू विक्रीसाठी येत असतो.

आजघडीला या जिनिंगमध्ये खरेदी झालेला व विक्रीस आलेला जवळपास वीस ते पंचवीस हजार क्विंटल कापूस होता. या सर्व कापसाला आग लागली आहे. लोकांना काही समजण्यापूर्वीच आगीने उग्ररुप धारण केले.

आगीची माहिती मिळताच नायगाव नगरपंचायतीची अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली. परंतु, एका गाडीने आग अटोक्यात येणे अशक्य असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे, जिल्ह्यातील अग्निशामक दलाच्या गाड्या पाठवण्याची मागणी नागरिकांनी केली. या आगीत करोडो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.