ETV Bharat / state

नांदेडच्या आठवडे बाजारात अतिक्रमण कारवाई विरोधात शेतकरी, विक्रेत्यांचा गोंधळ; भाजीपाला फेकला रस्त्यावर - अतिक्रमण कारवाई विरोधात शेतकरी, विक्रेत्यांचा गोंधळ

गोकुळनगर भागातून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या तसेच व्हीआयपी रस्त्यावर आठवडे बाजार भरवू नये, तर नेमून दिलेल्या जागेवर आणि रस्त्यावर भरवावा, अशा सूचना महापालिकेने केल्या होत्या. मात्र, काही विक्रेत्यांनी स्टेडीयमसमोर गोकुळनगर भागात मुख्य रस्त्यावरच बाजार भरविला.

nanded
नांदेडच्या आठवडे बाजारात अतिक्रमण कारवाई विरोधात शेतकरी, विक्रेत्यांचा गोंधळ; भाजीपाला फेकला रस्त्यावर
author img

By

Published : Feb 8, 2020, 10:48 AM IST

नांदेड - आठवडे बाजारात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिका आणि पोलिसांना शुक्रवारी (दि 7) शेतकरी आणि विक्रेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले . यावेळी अनेकांनी गोंधळ घालून रस्त्यावर भाजीपाला फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नांदेडच्या आठवडे बाजारात अतिक्रमण कारवाई विरोधात शेतकरी, विक्रेत्यांचा गोंधळ; भाजीपाला फेकला रस्त्यावर

हेही वाचा - नांदेडमध्ये पुन्हा एकदा अशोक चव्हाणांचे वर्चस्व; पोटनिवडणुकीत सहा पैकी पाच जागेवर काँग्रेसचे वर्चस्व

नांदेडला आठवड्यातील जवळपास प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भागात आठवडे बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, फळांची विक्री करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील शेतकरी, विक्रेते येत असतात. शुक्रवारच्या दिवशी गोकुळनगर आणि शिवाजीनगर भागात बाजार भरतो. मात्र , यावेळी गोकुळनगर भागातून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या तसेच व्हीआयपी रस्त्यावर आठवडे बाजार भरवू नये, तर नेमून दिलेल्या जागेवर आणि रस्त्यावर भरवावा, अशा सूचना महापालिकेने केल्या होत्या. मात्र, काही विक्रेत्यांनी स्टेडीयमसमोर गोकुळनगर भागात मुख्य रस्त्यावरच बाजार भरविला.

हेही वाचा - नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आले. तसेच पोलिसांचे पथकही सोबत होते. या वेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी वाद घालत सोबत आणलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना बसू दिले नाही.

हेही वाचा - फेसबुकबर चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल

अनेकांनी राग व्यक्त करत रस्त्यावरच भाजीपाला फेकल्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी बसू नये, अशा सूचना लाऊडस्पीकरद्वारे दिल्यानंतर काही वेळाने तणाव निवळून बाजार सुरळीत सुरू झाला. यावेळी शेतकरी आणि विक्रेत्यांनी आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

Intro:नांदेडच्या आठवडे बाजारात शेतकरी व विक्रेत्यांचा गोंधळ; भाजीपाला फेकला रस्त्यावर...!Body:नांदेडच्या आठवडे बाजारात शेतकरी व विक्रेत्यांचा गोंधळ; भाजीपाला फेकला रस्त्यावर...!

नांदेड: आठवडे बाजारात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिका आणि पोलिसांना शुक्रवारी ( दि.७ ) शेतकरी आणि विक्रेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले . या वेळी अनेकांनी गोंधळ घालून रस्त्यावर भाजीपाला फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नांदेडला आठवड्यातील जवळपास प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भागात आठवडे बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला , फळे आदी वस्तू विक्री करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यांतील शेतकरी , विक्रेते येतात . शुक्रवारी गोकुळनगर, शिवाजीनगर भागात बाजार भरतो. मात्र , या वेळी गोकुळनगर भागातून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या तसेच व्हीआयपी रस्त्यावर आठवडे बाजार भरवू नये , तर नेमून दिलेल्या जागेवर आणि रस्त्यावर भरवावा, अशा सूचना महापालिकेने केल्या होत्या. मात्र, काही जणांनी स्टेडीयमसमोर गोकुळनगर भागात मुख्य रस्त्यावरच बाजार भरविला. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सहायक आयुक्त अविनाश अटकोरे , अग्निशमन अधिकारी रईस पाशा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आले. तसेच पोलिसांचे पथकही सोबत होते. या वेळी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी वाद घालत सोबत आणलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना बसू दिले नाही. अनेकांनी राग व्यक्त करत रस्त्यावरच भाजीपाला फेकल्यामुळे काही काळ काही काळ गोंधळ उडाला. वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी बसू नये, अशा सूचना लाऊडस्पीकरद्वारे दिल्यानंतर काही वेळाने तणाव निवळून बाजार सुरळीत सुरू झाला. या वेळी शेतकरी आणि विक्रेत्यांनी आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

बाईट- १) शेतकरी
२) अविनाश अटकोरे
मनपा सहाय्यक आयुक्तConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.