नांदेड - जिल्ह्यातील लोहा तालुक्यात सावरगाव नसरत अंतर्गत येणाऱ्या सकूतांडा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेतात विहीर खोदण्यासाठी त्यांनी बँकेकडून २ लाखाचे कर्ज फेडता आले नाही म्हणून त्यांनी नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.
सावरगाव नसरत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सक्रुतांडा येथील शेतकरी बळीराम काशिनाथ जाधव (५५) यांनी विहीर खोदण्यासाठी आपल्या शेतात विहीर खोदकाम करण्यासाठी देना बँकेकडून २ लाख रुपये कर्ज घेतले होते. शेतात सततची नापिकी झाल्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. अशातच बँकेकडून कर्ज परतफेडीसाठी नोटीसा येत होत्या.
कर्ज फेडण्यासाठी असमर्थ असल्यामुळे बळीराम काशिनाथ जाधव निराश होते. या निराशेतून आत्महत्येचे पाऊल उचलले. याप्रकरणाची माळाकोळी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.