ETV Bharat / state

नांदेडच्या उमरीत वादळी वाऱ्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान, जनजीवन विस्कळीत - power supply

वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी केली आहे

उमरी तालुक्यात चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान;
author img

By

Published : Jun 7, 2019, 4:54 PM IST

नांदेड - उमरी तालुक्यामध्ये ४ जूनला वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे.

उमरी तालुक्यामध्ये ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात फळबागा व शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या तडाख्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले तर काही ठिकाणी तारा तुटल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून येथील नागरिक समस्यांचा सामना करीत आहेत.

शासनाने युद्ध पातळीवर आपदग्रस्तांना त्वरीत मदत द्यावी. याचबरोबर विद्युत पुरवठा सुरळीत करावा आणि सर्व बाबींची गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी केली आहे.

Intro:उमरी तालुक्यात चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान; पंचनामे करून नागरी सुविधा तातडीने पूरवा
माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांची मागणी
Body:उमरी तालुक्यात चक्रीवादळामुळे शेतीचे नुकसान; पंचनामे करून नागरी सुविधा तातडीने पूरवा
माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांची मागणी

नांदेड: उमरी तालुक्यामध्ये दि. ४ जून रोजी वादळी वार्‍यासह पाऊस होवून चक्रीवादळाच्या या तडाख्याने शेतीचे, जनावरे आणि नागरिकांच्या जिवनमानावर मोठा परिणाम झालेला आहे. अनेक नागरीक जखमी झालेले आहेत. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून तालुक्यामध्ये तातडीने पंचनामे करून जनतेला मूलभूत सुविधा पुरवाव्यत अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून केली आहे.

उमरी तालुक्यामध्ये ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे बहुतांश गावातील फळबागा व शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या भयंकर चक्रीवादळामुळे गावातील लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. शेकडो लोक या घटनेत जखमी झाले आहेत. उमरी व नांदेड रूग्णालयात रूग्णांवर उपचार चालू आहेत. या रूग्णांना तातडीने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तसेच अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. शेतकर्‍यांचा जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोयट्री फोर्मचे मोठे नुकसान झाले आहे. उमरी शहरातील व ग्रामीण भागातील जवळपास शंभर गावामध्ये विद्युत पुरवठा पोल पडल्यामुळे खंडित आहे. दोन दिवसापासून येथील समस्यांचा सामना करीत आहे. मागील अनेक वर्षातील सर्वाधिक भयंकर चक्रीवादळ होते. त्यामुळे शासनाने युद्ध पातळीवर आपदग्रस्तांना त्वरीत मदत द्यावी. विद्युत पुरवठा सुरळीत करावा, सर्व बाबींची गांभीर्याची चौकशी करावी, नुकसान ग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.