ETV Bharat / state

नांदेड : अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा पत्नीनेच केला खून - News about immoral relationships

इतवारा भागातील रहिवाशी सय्यद मनसबअली सय्यद मुमताज अली (वय - ४६) हा १४ फेब्रुवारीपासून घरातून निघून गेल्याने ग्रामीण पोलिसांनी हरवल्याची नोंद केली होती.

Divyang's husband killed by wife in nanded
अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा पत्नीनेच केला खून
author img

By

Published : Feb 22, 2021, 10:34 PM IST

नांदेड - काही दिवसांपुर्वी बोंढार शिवारातील पुलाजवळ घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. अपंग पती अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने मृताच्या पत्नीनेच इतर दोघांच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पत्नीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

हरवल्याची केली होती नोंद -

इतवारा भागातील रहिवाशी सय्यद मनसबअली सय्यद मुमताज अली (वय - ४६) हा १४ फेब्रुवारीपासून घरातून निघून गेल्याने ग्रामीण पोलिसांनी हरवल्याची नोंद केली होती. दरम्यान, १९ फेब्रुवारीला एक मृतदेह बोंडार शिवारातील पुलाजवळ आढळून आला होता. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी मृताची ओळख पटू शकली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यातील आणखी नऊ गावांमध्ये सात दिवसांचा लॉकडाऊन

पोलीस तपासात झाले उघड -

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. लग्नानंतर मृत अपंग झाल्याने त्याच्या पत्नीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध जुळल्यानंतर लग्न करण्याचे ठरले. मात्र, पतीन विरोध केल्याने त्याची हत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.