ETV Bharat / state

'मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्याची योजना महाविकासआघाडी सरकारने कोमात टाकली' - देवेंद्र फडणवीस मराठवाडा पाणी प्रश्न मत

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. प्रचारसभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 23, 2020, 10:00 PM IST

नांदेड - मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडून मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्याची योजना भाजपा सरकारची होती. आताच्या महाआघाडी सरकारने चाणाक्षपणा वापरून ही योजना ना सुरू ठेवली, ना बंद केली. ही योजना ‘कोमा’मध्ये टाकण्याचे पाप महाआघाडीच्या सरकारने केले आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणण्याची योजनाही गुंडाळली -
समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा भाजपाचा मानस होता. 167 टीएमसी पाणी आणण्याच्या योजनेचे काम सुरू करणे शेवटच्या टप्प्यात होते. यात केंद्र सरकारचीही मदत मागितली होती. येत्या सात ते आठ वर्षात मराठवाड्यातील दुष्काळ हटला असता. पण ही योजनाही महाआघाडी सरकारने गुंडाळण्याचे काम केले, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

भाजपाच्या काळात राज्य व केंद्र सरकारने विविध योजना आणल्या -
मराठवाड्यातील विविध अठरा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्या मंत्रीमंडळाने केंद्र सरकारकडून पैसा मंजूर करून आणला. तसेच मराठवाड्यासाठी महत्वाचा ठरणारा डीएमाआयसी प्रकल्पही आणला होता. 50 हजार कोटी रुपये रस्त्यासाठी केंद्र सरकारने दिले आहेत. महाविकासआघाडी सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा व विदर्भासह मागास भाग नाही. त्यांनी वैधानिक विकास मंडळ बंद केले आहे. या भागातील आमदारांनी बंद करू नका, असे म्हणण्याची हिमंतसुध्दा दाखवली नाही. आता मराठवाड्याला पैसा मिळण्याची शक्यता नाही. ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी जागे व्हावे लागते. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकित भाजपा उमेदवाराच्या पाठीशी राहावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

मोदी कर्मयोगी नेते आहेत -
लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रसरकारने समाजातील छोट्या घटकांसह अनेकांना मदत केली. नरेंद्र मोदी हे कर्मयोगी नेते आहेत. बिहारमध्ये कामाच्या बळावर निवडून आलो आहोत. बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण याच्याकडे पाहून मतदान नाही, तर मोदींना पाहून मतदान झाले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, मणिपूरमध्येही पोट निवडणूक जिंकल्याने आजही लोंकाचा मोंदीवर विश्वास टिकून असल्याचे दिसते आहे, असे फडणवीस म्हणाले.

महाआघाडीचे नेते बोलघेवडे आहेत -
महाविकास आघाडीचे नेते फक्त बोलघेवडे आहेत. त्यांनी कोणालाच मदत केली नाही. शिक्षकांना फक्त 20 टक्के अनुदान देण्याच काम केले. त्यांनी मित्रांशी बेईमानी केली. त्यामुळे 40 टक्के अनुदान रखडले आहे. संस्थाचालक ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप करत आहेत. मुंबईचे एसआरए प्रश्न विचारण्यासाठी पदवीधर आमदार सरस असतात. पण प्रत्यक्ष पदवीधरांचे प्रश्न ते मांडत नाहीत. आमचे पदवीधर उमेदवार शिरीष मालक नाही तर सेवक बनून काम करतील. हे सरकार फक्त घोषणा करते, त्या पूर्ण करत नाहीत. वीजबिल सवलत देऊ असे म्हणाले पण शेवटी सवलत दिली नाही. भाजपाच्या उमेदवाराला बहुमताने निवडून देऊन महाविकास आघाडी सरकारला शॉक देऊन त्यांची जागा दाखवा, असे आवाहन फडणवीसांनी केले.

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष लावण्याचे षडयंत्र
मराठा विरुद्ध ओबीसीत वाद लावण्याचे षड्यंत्र महाआघाडी सरकारमधील मंडळी करत आहेत. भाजपाने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले. देशात केवळ तामिळनाडूचे आरक्षण टिकले. आम्ही उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले. पण, आताचे राज्यसरकार सर्वोच्च न्यायालयात ते टिकवू शकले नाही. हे नाकाम सरकार असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

मग राज्याचे कुटुंब कोणाचे? रावसाहेब दानवे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओल्या दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यभर दौरा केला. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' म्हणत घराच्या बाहेर निघाले नाही. राज्य व राज्यातील जनता कुणाचे कुटुंब आहे, असा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.